नाशिक ग्रामीणनाशिक शहर

नाशिक रोड येथे बेकायदेशीर गॅस पंप उद्ध्वस्त पोलिसांची कामगिरी

Nashik road news

  1. नाशिक रोड येथे बेकायदेशीर गॅस पंप उद्ध्वस्त

वेगवान मराठी : मारुती जगधने

[दि . 21 ऑगस्ट 2025 ]

नाशिक रोड येथे विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून सदर गॅस वाहनधारकांच्या वाहनांमध्ये भरून त्यापासून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला नाशिक रोड पोलिसांनी रं गे हात पकडून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून संशयित आरोपी यास अटक करून त्याच्याजवळून एकूण 85 हजार रुपयांच्या मुद्देमालमत्ता जप्त केला आहे .

क्राईम ब्रँचयुनिट नंबर दोन यांनी ही प्रभावी कामगिरी केल्याचे उघड झाले .

नाशिक शहर व परिसरामध्ये विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये भरणारे इस्मविरुद्ध कारवाई करण्यात आले आहे .

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण,सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हा शाखा युनिट नंबर दोन ला आदेश दिल्यानंतर सदर वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरूनअवैद्य रित्या विकणारा संशयित आरोपी जेरबंद करून सदर संशयित आरोपीकडून 85 हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात काही गॅस सिलेंडरचा समावेश आहे .

दि.18 / 8 / 2025 रोजी शाखा क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीवरून पाटील गॅरेज च्या मागे भारती मठाजवळ एका पत्राच्या शेडमध्ये अवैद्य रित्या ज्वलंत पदार्थ भरण्याचे काम चालू होते .

खाजगी वाहन धारकांकडून मोबदला घेऊन त्यांना गॅस भरून देण्याचे काम या ठिकाणी बेकायदेशीरपणे चालू होते स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर काम करणाऱ्या सं शर्यात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली . आहे .

यासाठी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर ‘ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे,यशवंत बेंडकोळी, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, नितीन फुलमाळी या पोलीस पथकाने संबंधित संशयित आरोपी वरती
कारवाई करून संशयित आरोपी विशाल बाबुराव बोंडारे राहणार जय भवानी रोड नाशिक रोड त्याच्याकडून भारत गॅस एजन्सी चे भरलेले व रिकामी सिलेंडर ताब्यात घेण्यात आले .

त्यात काही रोख रक्कम देखील आहे असे एकूण 85 हजार रुपये किमतीचे माल
. हस्तगत केला आहे .या घटने संदर्भात पोलिसांनी कायदेशीर गुन्हा नोंदवून या संदर्भात एक प्रेस नोट जारी केलेले आहे त्यावरून सदरवृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!