आयशर – कंटेनरचा अपघात, सापडलं भलं मोठं घबाड… सत्य आले समोर

शरद शेळके, वेगवान न्युज
नाशिक पुणे महामार्गावर म्हाळोबा फाटा परिसरात आयशर आणि कंटेनरचा अपघात झाला आणि त्यावेळी सत्य समोर आलं.
पुणेकडून नाशिक बाजूकडे भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जाणारा आयशर क्रमांक एमपी 09 डिपी 4968 हा म्हाळोबा फाटा परिसरात उभ्या असणाऱ्या कंटेनरवर जाऊन धडकला आणि नाली मध्ये पलटी झाला. आयशर मध्ये मागील भागात ताडपत्री मध्ये शासनाने प्रतिबंध केलेले मांगुर जातीचे सुमारे प्रत्येकी १०० रुपये किलो प्रमाणे चार हजार किलो वजनाचे मासे आढळून आले.सदर ठिकाणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी येऊन खात्री केली.
शासनाच्या आदेशान्वये बंदी असलेला विदेशी मांगुर मासा या पध्दतीचे माशांचे साठे नष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहे. असे असतांना अमरसिंह दूलेसिंह राठोड, जिल्हा धार,मध्यप्रदेश याने त्याचे ताब्यातील आयशर गाडी क्रं. एम.पी. ०९ डी.पी. ४९६८ हे पुणे बाजुकडुन नाशिक बाजुकडे मरधाव वेगात चालवुन घेवुन जात असतांना कंटेनर क्र.एम एच ०२ एफ जी ४३५४ हा रस्त्याचे कडेला उभा असतांना त्यास पाठीमागील बाजुस ठोस मारुन अपघात केला नमुद वाहनामध्ये प्रत्तिबंधीत मांगुर नासे clarias gariepinus यांची मत्सपालन, व त्याची विक्री व वाहतुक बंदीचे आदेशाचे जानिवपुर्वक भंग करुन, पर्यावरणाला धोका निर्माण करुन तसेच त्याचे खाण्याने लोकांना गंभीर आजार व दुखापत होण्याची जाणीव असतांना वाहतूक करताना मिळून आल्याने वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



