नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

एकही शेतकरी वंचित राहता कामा नये!

Nandgaon News

एकही शेतकरी वंचित राहता कामा नये!

आमदार सुहास kandeकांदे यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

वेगवान मराठी : मारुती जगधने ९ October२०२६

नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार सुहास
कांदे यांनी गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) नांदगाव येथील आमदार निवासस्थानी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीचे पंचनामे, पीक पाहणी, पीकविमा तसेच आगामी काळातील पाणीटंचाई आणि चारा टंचाईवर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पंचनाम्यांत एकही शेतकरी सुटू नये!

दुष्काळामुळे बळीराजावर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सरसकट पंचनामे करताना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार कांदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी योग्य पद्धतीने करून घ्यावी. कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान पंचनाम्याअभावी दुर्लक्षित राहू नये, यासाठी प्रशासनाने दक्षतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना पीकविमा मिळविताना अडचणी येऊ नयेत, यासाठी पीक पाहणीची प्रक्रिया वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण करण्यावरही त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या संबंधित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

पाणीटंचाई आणि चारा टंचाईवरही चर्चा

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबरोबरच आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाई आणि चारा टंचाईचा प्रश्न बैठकीत चर्चेला आला. संभाव्य संकटाचा विचार करून प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे आणि आवश्यक उपाययोजनांची तयारी ठेवावी, याबाबत चर्चा करण्यात आली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीस उपविभागीय अधिकारी शीतल घोलप, तहसीलदार सुनील सैंदाणे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे, नांदगावचे नगराध्यक्ष सागर हिरे, नांदगावचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, मनमाडचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पंचनाम्यांपासून पीकविम्यापर्यंतच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!