नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

बुलढाण्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव; नांदगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Nandgaon News

बुलढाण्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव; नांदगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

वेगवान मराठी ; मारुती जगधने १० ऑक्टोबर २०२६

बोलठाण, ता. नांदगाव : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ सचिन सुखदेव गंडे यांना त्यांच्या निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ प्रदान करण्यात आला. रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा येथील भातृमंडळ हॉलमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम.ए. आणि योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या माध्यमातून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गोपचार क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांच्या योगदानाचा गौरव करणे, हा या सन्मानामागील प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्याला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड, बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. प्रशांत कपाले आणि एमजीएम विद्यापीठाचे योग विभागप्रमुख गंगाप्रसाद खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत, अशोक देवकर, संजय गवारे, स्मिता खारकर, राहुल देशमुख, आशिष सूर्यवंशी यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

बोलठाणसह नांदगाव तालुक्याचा गौरव

सचिन सुखदेव गंडे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे बोलठाणसह नांदगाव तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आल्याने विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या यशाबद्दल सचिन गंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा हा गौरव परिसरासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!