नाशिक ग्रामीण

सिन्नरच्या … या “आमदारा. ” मुळे वावी शिवारात फिरणार पाणीच – पाणी … !

ओसाड माळरानावर फुलणार हिरवीगार शेती

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर, दि : 23 एप्रिल 2026 — जवळपास 1972 पासून काळाच्या दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या तालुक्याला वरदान ठरणाऱ्या बंदिस्त पुरचारी मुळे नैसर्गिक शाप ठरलेल्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गावांना सुजलम — सुफलम करणारा ठरत आहे .
वर्षानुवर्ष दुष्काळ हा पाचवी लाच पुजलेला असल्याने तालुक्यातील जनता अनेक वर्षापासून आर्थिक मागास राहिलेल्या शेतकऱ्यांना देवदूताच्या रूपाने शेतकरी पुत्र समाजाची गरिबांची जाण असलेला एक कर्तुत्वन आमदार ” पाण देव ” म्हणून लाभला आहे.

सर्व सामान्य माणसाला आधार देऊन डोळ्यातलं आश्रु पुसुन खडकाळ माळराणावर जमीन ओली करून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करण्याचा चंग बांधलेला आमदार माणिकराव कोकाटे यांनी मागील वर्षी तालुक्यातील शहा परिसरातील या योजनेचा प्रत्यक्ष प्रयोग अमलात आणला आणि तो यशस्वी झाल्याची भावना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरून व प्रतिक्रिये वरून लक्षात येत आहे.
अनेक वर्षापासून दुष्काळाची चटके सोसलेल्या शेतकऱ्यांना अनेक आमदारांचा कारभार पाहिला.. त्यात काहींनी तालुक्यातील छोट्या मोठ्या योजना आणून दैनंदिन विकास कामा भर दिला असला तरी तालुक्याला ठोस असा प्रयोग करणारा पहिला आमदार लाभला तो म्हणजे मुसळगाव एमआयडीसी स्थापन करणाऱ्या स्वर्गीय सूर्यभान नाना गडाख यांचा. गरीब कुटुंबांमध्ये पुढे आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील या आमदारांनी कुठलंही शिक्षण नसताना परदेशात जाऊन उद्योजकांशी करार केले व मुसळगाव एमआयडीसीच्या खडकाळ माळराणावर औद्योगिक वसाहत उभी करून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला तसेच उद्योजक व व्यवसाय दळणवळण यांची साधनं तयार झाल्याने तालुक्यातील विकासात भर पाडली. अशा या आमदाराच्या ठोस व परिमान कारक कामामुळे श्री गडाख यांच्या कर्तुत्वाला तालुक्यातील जनते ने भरभरून साथ दिली त्यानंतर दुसरे आमदार लावले माननीय तुकाराम डीघोळे . श्री. डीघोळे सलग तिसऱ्यांदा आमदार होऊन राज्यमंत्री पदाचा मान मिळवलेल्या दिघोळे यांनी दूरदृष्टी लक्षात घेऊन सिन्नर जवळील माळेगाव चा खडकाळ .ओसाड माळरानावर शासकीय औद्योगिक व्यवसाय स्थापन करून तालुक्यातील रोजगारासह औद्योगिक विकासाला सिन्नर शहराला आर्थिक चालना मिळवून देण्यासाठी भर दिला. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करून तालुका गिरगाव हिरवा गार होण्याची स्वप्न पाहणाऱ्या अशा जनतेला योगदान लाभलेल्या अशा या दोन आमदारांनी तालुक्यातील जनतेला भरभरून दिलं आहे. कायमचा ठोस उपाय व विकास करणारे या दोन आमदारांना तोडीसतोड व प्रखर इच्छाशक्ती व धाडसी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने लाभले . श्री . कोकाटे यांनीही जनतेच्या मनात घर करून सलग पाच वेळा आमदारकी मिळवली अशी असतानाच आमदार कोकाटे यांनी जनतेचे आपण कुठेतरी ऋणी लागतो व समाजासाठी काय करू शकतो याचा अभ्यास करून तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्याचा चंग बांधला आणि वाया जाणार पाणी कुठलीही इलेक्ट्रिक वीज पंप न वापरता. विद्युत विज विज न वापरता फक्त नैसर्गिक उताराच्या आधारावर बंदिस्त पाईपलाईन करून पूर्व भागातील गावांना व नदी नाले व तळ्यांना पाण्याने भरून काढल्याने दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या व नेहमीच कोरडवाहू असलेल्या जमिनीवर या महत्त्वकांक्षी योजनेमुळे परीसरात पाणीच पाणी दिसू लागल्याने परिसर बहरुन लागला आहे.
मागील वर्षी शहा परिसरातील या पूर चारीच्या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांना दिसू लागल्याने यावर्षी उर्वरित वावी परिसरातील गावांनाही याचा फायदा व्हावा या दृष्टीने आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेऊन चालू वर्षी शेतकऱ्यांना पाणी मिळून देण्यासाठी या योजनेचा अक्षय तृतीया मुहूर्तावर शुभारंभ केला असून ही योजना पावसाळ्यापर्यंत पूर्ण होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील झालेल्या आमदारांपैकी जनतेची नाडी ओळखून ठोस व कायमस्वरूपी विकास कामांना भर देणारे या तीन आमदारांना जनता कधीही विसरणार नाही
…. वावी आणि परिसराला वरदान ठरणाऱ्या पूर चारीच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहे. कुंदेवाडी ते सायाळे ही ही 34.5 किमी अंतराची पूर झाली आहे. कुंदेवाडी येथून 28. 28 किमी वरती निर्हाळे. फत्तेपूर येथील बुवाजी बाबा मंदिराजवळून सदर पुरचारी प्रभावीत आहे याच ठिकाणावरील वावी गावासाठी पाणी उचलले जाणार आहे तीन ते चार किमी लांबीची व दोन फूट व्यासाची असलेली ही जलवाहिनी शेतकऱ्यांना पूरक पाणी देण्यासाठी ही जलवाहिनी फुलेनगर व्हावी परिसरात असलेल्या नवजीवन शाळेपासून पुढे असलेल्या म्हसोबाच्या माथ्यापर्यंत येईल आणि तिथून नैसर्गिक उताराने पाणी दोन विभागात विभागून वावीच्या दोन्ही बाजूने असलेल्या पाजर तलाव केटीवेअर ही भरून पुढे पिंपळवाडी व मिरगाव शिवारात जाईल हे पाणी लेडी. नदी व खारी नाल्याच्या माध्यमातून वावी गावच्या शिवारात 80 टक्के क्षेत्र ओलीता खाली आणली जाणार असल्याची माहिती सरपंच विजुभाऊ काटे यांनी दिली आहे.
बुवाजी बाबा मंदिराजवळील आउटलेट पासून व्हावी येथील पूर्वेकडील शेवटच्या परिसरात वीस मीटर ता खाली असेल पाणी उताराने पूर्ण क्षमतेने प्रभावित होईल वावी गावची एकूण महसूल क्षेत्र हे कशी हेक्टर आहे परिसरात पाणी आल्यास पंधराशे ते सोळाशे हेक्टर प्रत्यक्षात ओलिताखाली येऊन भविष्यात व्हावी व परिसरातील पीक पाण्याने समृद्ध होईल परिसर हिरवागार बहरून निघेल अशी आशाही काटे यांनी व्यक्त केली…….

—- विजय काटे. सरपंच.

वावी .या.सिन्नर

महत्त्वकांक्षी योजनेच्या प्रत्यक्ष कामाच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कामाचा शुभारंभ करण्यात आला .या प्रसंगी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता अविनाश लोखंडे. सरपंच विजय काटे. कैलास जाजू उपसरपंच वावी .विजय सोमाणी. विठ्ठलराव राजे भोसले. शंकर राजे भोसले. प्रशांत करपे .अशोक ताजने .संदीप राजे भोसले .भैय्या काटे. राजेंद्र काटे .योगेश ताजने. कन्हैयालाल भुताडा .अर्जुन काटे. गणेश वेल्हाळे .संतोष जोशी .साई कपिले. ज्ञानेश्वर खाटेकर .संतोष उगले .अर्जुन संधान .यश वाजे.सुभाष काटे यासह बहुसंख्य वावी व परिसरातील गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्षानुवर्ष भयान दुष्काळाच्या संकटाला सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय कोकाटे यांनी घेताना शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागणार नाही अशी योजना अमलात आणण्याचे चंगवाना असताना तज्ञांच्या सल्ला आणि दूरदृष्टी व सकल अभ्यासाच्या जोरावर भारतात प्रथमच अशी योजना सिन्नर तालुक्यात प्रगट झाली आहे ती कोकाटे यांच्या प्रेरणेतून या योजनेसाठी कुठलीही विद्युत पुरवठा लागत नाही व कुठलाही वीज पंप न वापरता नैसर्गिक उताराच्या आधारावर ही योजना प्रत्यक्ष अमलात आणण्यात कोकाटे यांना यश आले आहेत मोफत पाणी मोफत योजना ..‌फायदा मात्र सर्वांनाच…
या योजनेचे काम लवकरच पूर्ण होऊन चालू हंगामात शेतीला पाणी मिळेल अशी आशा व्हावी व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!