
संकटाच्या काळात मदतीचा ‘हात’…
वेगवान मराठी : मारुती जगधने दि.23 June 2026
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील निंबायती येथील शिकापूर वस्तीवर राहणारे श्री. रवींद्र तुकाराम पवार यांच्या झोपडीला अचानक भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत त्यांचे संपूर्ण घर आणि हक्काचा संसार जळून खाक झाला. एका क्षणात पवार कुटुंबाचे छत्र हरवले आणि ते उघड्यावर आले.
या घटनेची माहिती मिळताच, श्री. धनंजय आप्पा कांदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ आमदार सुहास आण्णा कांदे यांना सविस्तर माहिती दिली.
माहिती मिळताच, संवेदनशील लोकनेते आमदार सुहास आण्णा कांदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पवार कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सूचनेनुसार, पवार कुटुंबाला संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य आणि कपडे तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले.
पवार कुटुंबाला पुन्हा उभं करण्यासाठी सौ. अंजुमताई सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते संपूर्ण नवीन भांडी, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे आपुलकीने वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
“लोकांचे सुख-दुःख आपले मानून, संकटसमयी धावून जाणे हीच आमची संस्कृती आहे.” हाच वारसा जपत कांदे परिवाराने नेहमीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पवार कुटुंबाने या संकटसमयी देवासारख्या धावून आलेल्या कांदे परिवाराचे मनापासून आभार मानले आहेत.



