प्रशासनाने वेळेत आणि सक्षम नियोजनासह ही योजना जनतेपर्यंत पोहोचवावी, हाच खरा विकास ठरेल.
Nandgaon News
प्रशासनाने वेळेत आणि सक्षम नियोजनासह ही योजना जनतेपर्यंत पोहोचवावी, हाच खरा विकास ठरेल.
नांदगाव शहर व परिसरासाठी गेल्या कित्येक दशकांपासून पाणीटंचाई ही ज्वलंत समस्या राहिली आहे. नगरपरिषदेकडून २०-२२ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातसुद्धा २०-२५ दिवसांनी पाणी मिळत असल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व जनावरांचे हाल अपेष्टा सुरूच आहेत.
अशा परिस्थितीत गिरणा धरण ते नांदगाव पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी हा नांदगावकरांसाठी दिलासा देणारा टप्पा आहे. या योजनेअंतर्गत २८ किमी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या योजनेमुळे भविष्यात शहरातील पाणीटंचाईत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
तथापि, पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना वेळेत मिळणे आवश्यक आहे. प्रकल्पावर झालेला खर्च व केलेले नियोजन याला न्याय मिळावा, हे प्रशासनाचे मोठे दायित्व आहे. वेळेत योजना कार्यान्वित झाली, तर नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या नागरीकांच्या जगण्यालाही पाणीपुरवठ्याचा हातभार लागेल.
पाणी हा जगण्याचा मूलभूत हक्क आहे. गिरणा ते नांदगाव पाणीपुरवठा योजना ही केवळ विकासाची नाही, तर जीवनाला दिशा देणारी योजना आहे. तिच्या वेळेत व पारदर्शक अंमलबजावणीवरच नांदगावच्या भावी वाटचालीचा पाया अवलंबून आहे.
प्रशासनाने वेळेत आणि सक्षम नियोजनासह ही योजना जनतेपर्यंत पोहोचवावी, हाच खरा विकास ठरेल.
सन 1990 च्या दशकामध्ये नांदगावकरांसाठी गिरणा धरण पाणी पुरवठा योजना जीवन संजीवनी योजना ठरली होती मात्र ही योजना कालवाह्य झाल्याने योजना आता घटका मोजत आहे . आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्ना तून उभरण्यात येणाऱ्या स्वतंत्र नांदगाव साठी पाणीपुरवठा योजना नांदगावकरांसाठी पुन्हा एकदा नवसंजीवनी ठरेल अशी अपेक्षा करूया !
दरम्यान गिरणा धरणातून राबविली जाणारी 78 खेडी गिरणा पाणि योजनेचे नळ दारात गाडण्यात आले पण त्या नळांना पाणी कधी व केव्हा येणार ?



