कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचला कोर्टाचा दणका… 40 लाखांचा दंड
सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकळ यांच्या लढ्याला यश...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
नाशिक / सिन्नर : दि , 22 सप्टेंबर 2025 — कुठलाही उद्योग किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी संबंधित विभागांची काही नियमावली लागू करण्यात येते व त्या अंतर्गत सर्व अटी शर्ती चे पालन करणे आवश्यक असतानाही सिन्नर व कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीवर कोळपेवाडी ( गौतम नगर ) येथे महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या. सहकारी तत्त्वावर साखर कारखाना चांगल्या अवस्थेत सुरू आहे परंतु राजकीय वरदहस्त लाभलेल्या शंकरराव काळे यांच्या घराण्याला कारखाना चालवताना अनेक नियमावली ची पायमल्ली करून शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या या कारखान्याच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील जवळपास दहा ते बारा गावच्या हद्दीत मळीमिश्रीत पाणी भुगर्भीय पसरल्याने परीसरातील शेती नापिक होण्याच्या मार्गावर असून सुद्धा गेल्या विस वर्षे शेतकरयांनचा विरोध झुगारून मळीमिश्रीत पाणी सुरुच आहे. वेळोवेळी आंदोलने.उपोषणे झाली परंतु कारखाना प्रशासन आणि संबंधित संचालकांनी तात्पुरती मलमपट्टी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात होती.. प्रदुषण नियंत्रण विभागाने या परीसरात अनेक वेळा प्रत्यक्ष पाहणी करून ज्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला त्या सर्व कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना शुद्ध पाणी देण्यासाठी कारखाने पाण्याची टाकी देऊन त्यात दररोज पाणी टाकण्याची योजना अंमलात आणली होती.परतु जमिनीत भुगर्भीय पाणी साचल्याने परीसरातील जमिनीवर त्याचा परिणाम दिसून आला.. या संदर्भात प्रदुषण नियंत्रण विभागाने तसा अहवाल सादर केला होता परंतु कारखानाचे चेअरमन व आमदार आशुतोष काळे यांच्या राजकीय फायदा घेत अधिकारी व कर्मचारी यांच्या वर दबाव आणून या अहवालात फेरफार करण्याचा प्रयत्न केला जात असे… परंतु कोळगाव माळ येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकळ यांनी कोर्टात धाव घेतली व सातत्याने पाठपुरावा केला.. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले असून संबंधित कारखान्याला 39 लाख 30 हजार रुपये दंड ठोठावला आहे…
@. माजी सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकळ सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे समर्थक विद्यमान आमदार आशुतोष काळे व चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना डिस्टलरी विभाग यांना नाशिक प्रदूषण मंडळानी ३९ लाख. तीस हजार दंड केला असतानी सत्तेच्या मस्तीवर राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार आमचे सोबत आहे आम्ही सरकारमध्ये आहे सरकार आमचे आहे असे म्हणून आमदार आशुतोष काळे अधिकारी यांच्या वरती दबाव टाकून दंड भरण्यास नकार दिला असून अधिकारी यांच्यावरती दबाव टाकत असे अखेर राष्ट्रीय ग्रीन ट्रायबुनल वेस्टन झोन पुणे यांनी नेमलेल्या समितीने प्रत्यक्ष झालेल्या प्रदूषणाची स्थळ पाहणी करूनअहवाला सादर केला त्या नुसार मोकळ यांचे विद्वान वकिल एडवोकेट मैत्रीय घोरपडे यांनी पुणे कोर्टासमोर कारखान्याने केलेल्या प्रदूषणाची बाजू मांडून अखेर ३९ लाख तिस हजार दंड भरण्यास भाग पाडले व पुणे कोर्टाने पुढील आदेश महात्मा फुले कृषी विद्यापीठ यासारखी समिती नेमून कारखान्याने केलेले प्रदूषणाची परिसरातील भूजल जमिनीची तपासणी करून केलेले प्रदूषणाचे नुकसान किती जमिनीवर झालेले आहे याचा अहवाल समितीने पुणे कोर्टात सादर करायचा आहे असे आदेश काढले आहे यात मोकळ यांचे सर्वत्र प्रदूषण विभागात कौतुक होत असून केलेल्या दंडा बद्दल मोकळ यांची शासन दरबारी पर्यावरण रक्षक म्हणून नोंद झाली असून उत्तम मोकळ यांनी मेहरबान पुणे कोर्टाचे आभार मानून तसेच राष्ट्रीय ग्रीन ट्रायनुबल समिती पुणे व प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांचे आभार मानून पुढील जल प्रदूषण व वायु प्रदूषण यावर जनतेच्या हितासाठी व मानवाच्या कल्याणासाठी तसेच वन्य प्राणी पशुपक्षी पर्यावरणाचे रक्षण करेल यासाठी सदैव काम करत राहील असे ही मोकळ यांनी सांगितले …@ 



