नाशिक ग्रामीण

नाशिक ; सिन्नर तालुक्यातील या गावात समाजकंटकांने केली स्वामी ची विटांबना.,. पोलीसात गुन्हा दाखल

स्वामी भक्त व सामाजिक कार्यकर्ते आणि गावकर्यामध्ये संताप....

φवेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर , दि : 6 डिसेंबर 2025 —

नाशिक जिल्ह्यात तील या तालुक्यात समाजकंटकाकडून  अद्वैत गिरी स्वामी महाराज व बजरंग बलीची विटंबना… गुन्हा दाखल ……
सिन्नर ,दि : 6 डिसेंबर 2025 दत्त जयंती निमित्त महाराष्ट्रभर उत्सव सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सांगवी या गावात एका समाज घटकांकडून घृणास्पद घटना घडल्याने स्वामीभक्त व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांगवी येथे आनंदवन आश्रम परमार्थ ट्रस्ट गुरुदत्त आश्रम असून दत्त जयंती निमित्त परिसरात एकच भक्तिमय वातावरणात कार्यक्रम सुरू असताना एका माथे फिरू समाज घकंटकाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती जवळ जाऊन अस्लिश चाळे करत नको त्या ठिकाणी हात लावणे स्वामींच्या खिर्यातून पैसे काढून घेणे स्वामींना पैशाची मागणी करणे व स्वामींच्या मांडीवर आडवे तिडवे पसरून अंगविक्षेप करत नको त्या अवस्थेत कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी समाजकंटकावर सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संबंधित समाजकंटकावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी स्वामी भक्तांसह सर्व समाजातुन होते आहे.आनंद ट्रस्ट आश्रमातील सेवेकरी भाऊसाहेब ठकाजी शिंदे वय 54 यांच्या प्रत्यक्ष पाहणीनुसार सदर बाब समोर आली आहे . दि. 4 डिसेंबर रोजी शिंदे ही नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता आनंदवन आश्रम परमात्मा ट्रस्ट येथे सेवा करण्यासाठी गेले असता तिथे दत्त जयंतीचा कार्यक्रम असल्याने स्वामी देवानंद यांचा प्रवचनाच्या कार्यक्रमानिमित्त मंदिरात भरपूर गर्दी केली होती.. सायंकाळी चार वाजे दरम्यान याच गावातील तरुण शिवनाथ आढाव हा मध्य धुंद अवस्थेत हातात लोखंडी पाईप घेऊन श्री आनंदवन आश्रम परमार्थ ट्रस्ट येथे आला व प्रवचन चालू असताना श्री स्वामीजींच्या शेजारी व्यासपीठावर येऊन बसला व स्वामीजींच्या खिशातून त्यांच्याशी झटापटी करून मला पैसे द्या असे म्हणून त्यांनी स्वामीजींच्या खिशातून 500 रुपये घेतले त्यानंतर तिथे जमलेल्या सेवेकरी गंगाधर एकनाथ भुमरे. सतीश सुभाष सावळे. किरण काशिनाथ घुमरे. केशव भाऊसाहेब भाऊ मोरे .राहुल बाबासाहेब भिंगट. यांनी रवींद्र शिवनाथ आढाव यांना तेथून बाजूला केले असता या माथेफिरूने

सर्वांना धक्काबुक्की करून मला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला एका एकाला बघून घेईन तसेच स्वामीजींना जगू देणार नाही असा दम देऊन तिथून तो निघून गेला दिनांक तीन 11 2025 रोजी सकाळी 9:45 वाजेच्या दरम्यान रवींद्र शिवनाथ आढाव यांनी आमची श्री आनंदवन आश्रम परमार्थ ट्रस्ट सांगवी संचालित अद्वैतानंद गिरी महाराज गुरुकुल शाळेची बस थांबून बस मधील विद्यार्थ्यांना व चालकांना शिविगाळ केलेली होती .
श्री स्वामींच्या आश्रमात जाऊन बसणे मूर्तीच्या श्रीमुखात मारणे. मूर्ती समोर अस्लिश हवभाव करणे मूर्तीला चुकीच्या ठिकाणी हात लावणे असे प्रकार घडत असताना बाळासाहेब विठोबा घुमरे .अशोक सखाराम घोटेकर .मधुकर किसन घुमरे .यांनी बघितले असता त्यास मंदिरातून काढून दिली होती परंतु 29 9 2019 रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान गावातील मारुती मंदिरात हरिपाठ चालू असताना भजनी मंडळ व भक्तांना धक्काबुकी करत हरिपाठ सांगणारे महाराज यांचा माईक हिसकावुन घेणे.. श्री अशोक महाराज घुमरे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम चालू असताना तिथे जाऊन आरडाओरडा करणे व धार्मिक कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या समाजविरोधक कृत्य करून गावातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत .त्यामुळे या सर्व प्रकारावर पायबंद घालण्यात यावा व संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून स्वामी भक्तामध्ये संताप व्यक्त होत आहे.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!