शेती

सणा सुदीला जनावरे काढली विकायला… कांद्याच्या भावाचा लागेना मेळ… घसरणीमुळे शेतकरी हवालदिल

सणा सुदीला जनावरे काढली विकायला... कांद्याच्या भावाचा लागेना मेळ... घसरणीमुळे शेतकरी हवालदिल

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला : दि: 21 सप्टेंबर 2025

कांदा कवडीमोल दराने विकला जात आहे. सातशे ते हजार किंवा तीनशे रुपयांचा दर हा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. पैस्याची आवकच नसल्याने आता शेवटचा पर्याय म्हणून सणासुदीला दुभती जनावरे विकायला काढली आहेत. गावोगावी व्हाट्सअप ग्रुप मधून तशा जाहिराती फिरत आहेत…
मका परिपक्व होऊन धान्य विकण्या पेक्षा मुरघास म्हणून देण्या कडे कल वाढला आहे…
अंदरसुल परिसरात शेतकऱ्यांनी शेळ्या-बकऱ्या विकायला काढल्या आहेत…

एकीकडे दसरा दिवाळी तोंडावर असतानाकांदा चाळीत खराब होत आहे.शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

कांद्याची लागवड, मजुरी, खते, रोप, साठवणूक यावर लाखोंचा खर्च होत असतानाही बाजारात दर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या आशेने कांदा साठवून ठेवला; मात्र हवामानातील अनियमित बदलांमुळे साठवलेला कांदा झपाट्याने सडू लागल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.
घरखर्च, कर्जफेड, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण झाले असून शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे.

###########

कांद्याला अपेक्षित भाव न मिळण्यास राज्य व केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे.
कांद्याला हमीभाव कायमस्वरूपी देणे काळाची गरज आहे व कांदा जीवनावशक वस्तू तुन वगळण्यात यावा नाही तर आगामी काळात आत्महत्येशिवाय व शेती विकण्या शिवाय शेतकऱ्यांन पुढे पर्याय राहणार नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज
:- दीपक सूर्यभान जगताप, कांदा उत्पादक शेतकरी
#############

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!