नाशिक ग्रामीण

मनमाड पुणे हायवे वाहतूक ठप्प !

Nandgaon Manmad news

मनमाड-पुणे हायवेवर रहदारी ठप्प

वेगवान मराठी : मारुती जगधने

मनमाड [: दि 25 ऑगस्ट 2025 ] मनमाड ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण झाल्याने संपूर्ण रहदारी ठप्प झाल्याची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. मनमाड शहराजवळ पाच ते सात किं मी वर हा अडथळा अधिक जाणवत असून छोट्या-मोठ्या वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत लागल्या आहेत.गत तीन दिवसापासून ही गंभीर समस्या वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे .

वाहनांची गर्दी एवढ्या प्रमाणात वाढली आहे की ट्रक, कंटेनर, खासगी बस तसेच प्रवासी वाहने तासन्तास एकाच ठिकाणी अडकून पडली आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत असून रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवा देखील वेळेत पोहोचण्यात अडथळा निर्माण होत आहे.

दरम्यान, वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण म्हणजे नादुरुस्त अवजड वाहने, हायवेवरील सुरू असलेली दुरुस्तीची कामे तसेच वाढलेली मालवाहतूक असल्याचे समजते. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्पुरती वाहतूक व्यवस्था उभारली असली तरीही वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा मिळालेला नाही.

या गंभीर वाहतूक समस्येमुळे व्यापारी, शेतकरी तसेच प्रवासी वर्ग त्रस्त झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!