महाराष्ट्र,देश

या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणाऱ्या रस्त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत

या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणाऱ्या रस्त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत

वेगवान मराठी : एकनाथ भालेराव

येवला :दिनांक: 15जानेवारी 2026/येवला तालुक्यातील येवला ते भारम–रहाडी हा अत्यंत वर्दळीचा रस्ता सध्या प्रचंड दुरवस्थेत सापडला आहे.

ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.

येवला ते भारम–रहाडी या संपूर्ण मार्गावर डांबर उखडून मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने, शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच नागरिक प्रवास करतात.

मात्र सध्याच्या परिस्थितीत वाहन चालवणेही जीवघेणे ठरत आहे. पावसाळ्यानंतर खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक ठिकाणी रस्ता पूर्णतः खराब झाला आहे.

दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

वाहनांचे नुकसान; अत्यावश्यक सेवांवर परिणाम
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

परिणामी रुग्णवाहिका, शालेय बस तसेच इतर अत्यावश्यक सेवांनाही याचा फटका बसत आहे.

रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळेही अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
………………

प्रतिक्रिया

दत्ता जेजुरकर (सामाजिक कार्यकर्ते, भारम)
या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने कोणताही विलंब न करता तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे.
……,………………………….
……… प्रतिक्रिया,,, इशारा,,

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या या येवला भारम राहडी या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मार्गाच्या कडेला झाडे झुडपे ने रस्ता पूर्णपणे व्यापला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.”
येवला–भारम–रहाडी रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नंदू आबा सोमासे यांनी दिला आहे .

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!