नाशिक ग्रामीण

वटारसह परिसरात बिबट्याची वाढली दशहत , वनविभागाची डोळेझाक पशुधन धोक्यात , रोजच होते बिबटयाचे दर्शन,

 

  •  वटारसह परिसरात बिबट्याची वाढली दशहत ,पशुधन धोक्यात ,  रोजच होते बिबटयाचे दर्शन,  वनविभागाची डोळेझाक

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

विरगांव दि.२३ऑगस्ट २०२५ :-
वटार येथिल भायडे वस्तित बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या दुभती जनावरांवर ताव मारत आहे आज मध्य रात्री वटार येथील भास्कर चिंतामण बागुल यांच्या राहत्या घराजवळील बैलांच्या शेडवर्ती हल्ला चढवत वासरू ठार केल्याने गरीब शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जवळपास 10 ते 15 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी गोकुळ शंकर पवार या शेतकऱ्याची शेळी फस्त केली होती. आज लगेच वासरूचे भक्ष्य करून बिबट्याने आपली दहशत कायम ठेवली आहे.
सायंकाळ पासूनच रोजच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देत असुन पुन्हा एकदा नागरिक भयभीत झाले आहेत .पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी ह्या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरेहि मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
” गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून 20ते 25 निष्पपाप मुक्या प्राण्यांचा बळी गेला. गेल्या अनेक दिवसापूर्वी सावतावाड़ शिवरात बिबट्याचा वावर आहे. वनविभागाला या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा पिंजरा लावण्यायासाठी मागणी वेळोवेळी केली आहे  मात्र याकडे वनविभागाने पुर्णतः डोळेझाक केली असल्याचे  नागरिकांचे म्हणणे असुन वनविभाग सुस्त .. बिबट्या मस्त अस आता नागरिकांना वाटतंय, वनपालांच्या कृपेने परिसरात अवैद्य वृक्ष तोड होते तेव्हा वनपाल लक्ष्य घालतात, मग बिबटयाचा हल्ला होतो तेव्हा कुठे जातात  हा सवाल उपस्थित केला जात आहे. सावतावाड़ि, शाळेची पंदि आदी परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून दोन  तीन शेतकऱ्याना मुक्त दर्शनही दिले आहे. दरववर्षि पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतो व् पाळीव प्राण्याणवर ताव मारतो. येथे लपन्यासाठी मोठी काटेरी जुड़पे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्या आपले काम फत्य करुण घेतो.
मेंढपाळ तर दर वर्षी जेरिस आले असून दरवर्षी 10 ते 12 मेँढ़या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोड़धंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागरण करत काढावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करत आहेत.
कोट:-1
मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा झोपेतून जाग आली व बाहेर निघून पाहतो तर बिबट्याने वासरू वरती हल्ला चढवत मारून खात होता आरडाओरडा करून बिबट्याला पळवला खरं पण वासरू वाचू शकल नाही. बऱ्याच दिवसापासून आम्हाला शेतात बिबटे मोकळे दिसतात, जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात जाता येत नाही आज अनेक संकटाना तोंड देऊन शेती व्यवस्था सुरळीत ठेवली आहे त्यात अशी हानी होत राहिली तर आम्ही काय करायचे  आज माझ्यावर हे संकट आले आहे उद्या कोणावरहि येऊ शकते त्यासाठी वनविभागने झोपेतुन झागे होऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
भास्कर बागुल (शेतकरी वटार)
कोट:-
गेल्या अनेक दिवसंपासून आमच्या हाडक्यात ह्या मळ्यात बिबट्या वास्तव्याला आहे शेतीला पाणी देणे काढीन झालं आहे, गडी मानस कामाला येत नाहीत, शेती कसने कढीन झाली आहे. वन विभागाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर पिंझरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा नाहीतर मानव हानी सुद्धा होऊ शकते.
सुनील खैरणार (शेतकरी वटार)
 

 

 

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!