उगवत्या पहाटे आयशर टेम्पो पलटी; मोठा अनर्थ टळला
नांदगाव | वेगवान मराठी; दि :30 July2026
मारुती जगधने, नांदगाव
नांदगाव–मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ वर गुरुवार, दि. ३० जुलै रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोचा अपघात होऊन मोठा अनर्थ टळला. नांदगावकडून मनमाडकडे सालेय साहित्य घेऊन जाणारा आयशर टेम्पो चालकाला झोपेची डुलकी लागल्याने सुमारे १०० फूट पुढे जाऊन पलटी झाला.
घटनास्थळी असलेल्या घरापासून हा टेम्पो अवघ्या १०० फूट अंतरावर थांबल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा टेम्पो घरावर आदळून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
अपघातानंतर वाहन चालकाने सांगितले की, वाहन चालवत असताना झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.
पहाटे अचानक झालेल्या जोरदार आवाजामुळे फुलेगर वस्ती परिसरातील नागरिक जागे झाले. अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, नांदगाव–मनमाड रोडवरील फुलेनगर हद्दीत सातत्याने वेगवान वाहनांमुळे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, वेगमर्यादा दर्शक फलक, रंबल स्ट्रिप्स (स्पीड ब्रेकर पट्टे) तसेच आवश्यक वाहतूक सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
नांदगाव : नांदगाव-मनमाड मार्गावरील फुलेनगर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३J वर गुरुवारी सकाळी मालवाहू ट्रकचा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.



