आर्थिकशेती

फुलांचा बाजार वाढला, झेंडुला एवढा झाला भाव

वेगवान नाशिक 

नाशिक , ता. 24 जुलै येत्या काही दिवसात श्रावण त्यानंतर गणेश उत्सव पितृ पंधरवाडा आणि त्यानंतर नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिका सुरू होणार असल्याने फुलांच्या बाजारामध्ये उत्साह दिसून येत आहे.

फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहार आलाय. सध्या देखील फुलांची मागणी वाढल्याने फुल बाजारात तेजी असल्यामुळे फुलांच्या किमती जवळपास दुप्पट झाले आहेत.

चतुर्मासात वेगवेगळे सणावर उत्सवाबरोबरच धर्मकार्य केली जातात त्यानंतर लग्नसरी देखील फुलांना चांगली मागणी असते. फुल निर्मिती शेतकरी विक्रेते सजावट करणाऱ्या अशा सर्वांनाच सुगीचे दिवस यानिमित्ताने येतात.

अवकाळी पावसामुळे फुलांच्या उत्पादनात काहीशी घट झाले नाही त्याचा परिणाम किमतीवर झालाय मनमाड सह नाशिक जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागांमध्ये फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली मनमाड फुल बाजारात ग्रामीण भागाबरोबरच नाशिक निफाड दिंडोरी मालेगाव शिर्डी गुजरातच्या ग्रामीण भागातून फुले शहरात येतात गुलाब मोगरा शेवंती चाफा झेंडू कमळ निशिगंधा अस्तर व धोत्रीची फुले यांना या काळात चांगली मागणी असते.

कोणत्या फुलाला किती भाव ते जाणून घेऊया काही दिवसापूर्वी पन्नास रुपये डझन असलेला गुलाब आता 80 रुपयांवर गेलाय आगामी काळामध्ये याचे भाव अजून वाढणार असल्याची माहिती आहे. मोगरा शेवंती सह अनेक फुलांचे भाव वाढलेत झेंडूचा दर आता जवळपास दोनशे रुपये प्रति किलो वर जाऊन पोहोचलाय तर मोगरा 800 रुपये प्रति किलो आहे शेवंती 300 रुपये प्रति किलो अस्टर 400 रुपये निशिगंधा चारशे रुपये धोतरा बारा रुपये प्रति नग असा दर आहे

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!