आरोग्य

सिन्नर च्या खेडेगावातील साधा माणूस झाला ” पर्यावरण रक्षक ” म्हणून महाराष्ट्रचा अध्यक्ष… !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर , दि : 23 नोव्हेंबर– पर्यावरण रक्षक प्रदेशाध्यक्ष पदि सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र व आय डी कार्ड देण्यात आले आहे.

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा…. उत्तम मोकळे यांचे महाराष्ट्र पर्यावरण रक्षक म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती — !


— पर्यावरण व आरोग्य विषयक समाज जागृती व कृत्रिम प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आर टी आय जागता संघटना यांच्यामार्फत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर च्या
कोळगाव माळ येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकळ यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात एक मानाचे स्थान मिळाल्याने श्री मोकळ यांनी नाशिक जिल्ह्याची मान उंचावली आहे.
श्री मोकळे हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पर्यावरणाच्या बाबतीत जागरूकता व न्याय हक्कासाठी झगडत आहे. सिन्नर तालुक्यातील पर्यावरण संबंधित अनेक प्रश्न व त्यांना वाचा फोडत असताना सिन्नर व नगर हद्दीत च्या सीमेवर असलेल्या कोळपेवाडी येथील कर्मवीर सहकारी साखर कारखान्याच्या कारखाना व डिसलरी विभागामार्फत मळयुक्त पाण्याचा परिसरात होणारा वापर व त्या अनुषंगाने भूगर्भीय परकुलेशन झाल्याने परिसरातील शेती नापीक होण्याची भीती व्यक्त होत असताना मोकळ
यांनी अनेक वेळा आवाज उठवला परंतु प्रस्थापित व धनदांडग्या राजकीय दबावापुढे संबंधित सरकारी अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या व मोकळ यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रश्न दाबून ठेवत गेले परंतु मोकळ यांनी हार न मानता व दबावापुढे न झुकता कुठल्याही तडजोडी ला बळी न पडता सतत संघर्ष करीत राहिले. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेऊन पर्यावरणाविषयी व कारखान्याच्यामुळे युक्त पाणया विषयी आपली बाजू भक्कमपणे मांडून न्याय मिळवला व या संदर्भात न्यायालयाने संबंधित कारखान्याला चाळीस लाखाचा दंड भरण्याचा आदेश दिला असून यापुढे मुळेयुक्त पाणी या परिसर सोडली जाणार नाही याची जबाबदारी घेण्याचे हमीदिली आहे .या व अनेक प्रश्न व सातत्याने आवाज उठवणारे मोकळे यांना प्रदूषण नियंत्रण तथा आर टि आय आयोग या विभागामार्फत पर्यावरण रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री मोकळ यांच्या पर्यावरण व सामाजिक कार्याविषयी सातत्य व नियमित्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून आर टी आय संघटना भारत संस्थापक अध्यक्ष संदेश कुमार भाटी ( पर्यावरण विभाग ) यांच्यामार्फत अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!