शेतकरी बंधुनो चला येवल्याला कर्जमुक्तीच्या हक्काच्या मागणीला!
शेतकरी बंधुनो चला येवल्याला कर्जमुक्तीच्या हक्काच्या मागणीला!

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला दिनांक 20 जुलै 2024
शेतकरी बंधुनो चला येवल्याला कर्जमुक्तीच्या हक्काच्या मागणीला!
सर्व मध्यम मुदत थकीत शेतकरी बांधवांना आवाहन
नाशिक जिल्हा बँक मध्यम मुदत कर्ज – शून्य टक्के व्याज योजना अंमलबजावणीसाठी लढा उभारूया!
मंत्री महोदय यांना साकडे घालूया “!!
📍 ठिकाण: मा. श्री. छगन भुजबळ साहेब यांचे संपर्क कार्यालय, येवला
🕘 *वेळ: सकाळी ९:०० वाजता*
📅 *दिनांक: २१ जुलै २०२५*
*शेतकरी संघटना समन्वय समिती – महाराष्ट्र राज्य*
राज्य समन्वयक: भगवान पुंडलिक बोराडे – 📱 9421729433
*संयोजक: भागवतराव बा. सोनवणे*
(शेतकरी कर्जमुक्ती अभियान – येवला तालुका, जि. नाशिक)
📱 8806272733 / 9689333399
📧 Farmers.Maharashtra@gmail.com
🟨 प्रति,
*मा. श्री. छगनराव भुजबळ साहेब*
*पालक (मंत्री) – नाशिक जिल्हा*
विधानसभा सदस्य – येवला
*मंत्री – अन्न व नागरी पुरवठा, महाराष्ट्र राज्य*
विषय:
*नाशिक जिल्हा बँक वाचविणे तसेच मध्यम मुदत कर्जावरील “शून्य टक्के व्याज” योजना आणि १० सुलभ हप्त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणी संदर्भातील निवेदन.*
माननीय महोदय,
आपण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जदार म्हणून त्यांच्यावर अतोनात व्याजाचा बोजा पडलेला आहे.
*स्थिती पुढीलप्रमाणे आहे:*
एकूण थकीत शेतकरी: ५६,०४०
थकीत मुद्दल: ₹९०१.७९ कोटी
बँकेने यातील ₹६२०.११ कोटी व्याज माफ करण्याची तयारी दाखवलेली आहे
मात्र उर्वरित ₹६७९ कोटीचे व्याज शेतकऱ्यांकडून वसूल करण्याचा बँकेचा मानस आहे.
*शेतकऱ्यांची भूमिका व भावना:*
शेतकऱ्यांची ही व्याज भरण्याची कुवत नाही. *शेतजमिनी लिलावात जाऊन किंवा बँक बुडाली तरी शेतकऱ्यांना या अन्यायकारक व्याजाची परतफेड मान्य नाही.*
*या अन्यायाविरुद्ध ७७५ दिवसांपासून शांतीपूर्ण आंदोलन सुरू आहे.*
*मागण्या:*
1. मध्यम मुदत कर्जावर संपूर्ण व्याज माफी (०% व्याज योजना) जाहीर करावी
2. शिल्लक मुद्दल १० सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची योजना अमलात आणावी
3. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर सुरू असलेली लिलाव / नोटीस प्रक्रिया तत्काळ थांबवावी
*आपल्याकडून अपेक्षा:*
*आपण राज्याचे ज्येष्ठ, अनुभवी व लोकाभिमुख मंत्री आहात. त्यामुळे ५६ हजार शेतकरी कुटुंबांचा विश्वास आहे की, आपल्याच पुढाकाराने ही न्याय्य योजना शासन दरबारी मान्य होऊ शकते.*
*योजना अमलात आल्यास:*
✅ बँकेचे पुनरुज्जीवन होईल
✅ शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक दिलासा मिळेल
✅ जिल्ह्याची अर्थव्यवस्था सशक्त होईल
*विनम्र निवेदक:*
भगवान पुंडलिक बोराडे
राज्य समन्वयक – शेतकरी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र
📱 9421729433
भागवतराव बाळनाथ सोनवणे
संयोजक – शेतकरी कर्जमुक्ती अभियान, नाशिक जिल्हा
📱 8806272733 / 9689333399
📧 Farmers.Maharashtra@gmail.com
(संदर्भ: यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री व बँक प्रशासक यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती संलग्न आहेत.)



