मायबाप सरकार आता दिवाळी नव्हे दिवाळ साजरा करणार का शेतकऱ्यांचा जिवंत सवाल…. हरिभाऊ सोनवणे प्रगतीशील शेतकरी
मायबाप सरकार आता दिवाळी नव्हे दिवाळ साजरा करणार का शेतकऱ्यांचा जिवंत सवाल.... हरिभाऊ सोनवणे प्रगतीशील शेतकरी

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :दिनांक :4 वर ऑक्टोंबर: राज्यात मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात रौद्र स्वरूप धारण केले.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात खरिपाची पिके उध्वस्त झाली. दुसरी कडून उरलेसुरले मका,कापूस ,कांदा, बाजरी या पिकातही पुन्हा एकदा पाऊस झाल्यामुळे पाणीच पाणी साचले.
अद्यापही कुठलीच मदत मिळत नसल्याने मायबाप सरकार आता शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणार की दिवाळ असा प्रश्न शेतकरी वर्ग उपस्थित करत आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा फटका बसला त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप हंगामाचे नुकसान झाले.
अद्याप शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळालेली नाही.पूर्णपणे शेतकरी संकटात सापडला आहे. उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या कचाट्यातून उरले, सुरलेले पीक पुन्हा झालेल्या पावसात पूर्णपणे पाण्यात गेले आहे.
शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या गाळातून पीक वाचवता वाचवता दसरा साजरा केला.या उरसुरीतून आगामी दिवाळी सण साजरा करण्याची शेतकऱ्यांचे अपेक्षा होती. मात्र पुन्हा आलेल्या पावसामुळे ही अपेक्षाही फोल ठरली आहे.
आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे. परंतु शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडेच शासनाचे दुर्लक्ष झाले आहे कुठल्याही पक्षाचे सरकार असो.ते पक्ष आपल्याच मस्तीत सरकार हाकत आहे मोठमोठ्या योजनासाठी शासनाकडे कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र जे शेतकरी अहोरात्र काबाडकष्ट करून देशाला अन्नपुरवठा करतात त्यांच्यासाठी शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे.मायबाप सरकार हे वागणं बर आहे का? यातून शासनाचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण झाले आहे.



