शेती

आता शेतकऱ्यांची सटकली … गोदावरी कालव्याच्या सिमेंट प्लास्टरच्या कामाला सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध…

हजारो शेतकरी एकत्र येऊन पाडले काम बंद --

मोठी बातमी  ;  Wgwan news

वेगवान मराठी /  भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर ,दि ;  31 डिसेंबर 2025 — सध्या सुरू असलेल्या गोदावरी उजव्या कटकालव्याच्या सिमेंट काँक्रीट करण्याच्या प्लास्टरच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली असून निफाड तालुक्यातून सुरू झालेल्या कामाला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर होतो आंदोलन करण्याचा प्रयत्न केला व काम न होण्यासाठी सहकार ला होतो व्यवहार करूनही हे काम पुढे सुरूच आहे. यासाठी सोमठाणे  परिसरातील शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते विनोद नाट्य यांच्या नेतृत्वाखाली सदर गान काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता परंतु अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे आंदोलनकर्त्याची बोळवण करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले व काम पुढे सुरूच आहे.

— धरण उशाला कोरड घशाला —

गोदावरी कालव्याला सिमेंट काँक्रिटीकरण करणे म्हणजे *  धरण उशाला… कोरड घशाला ..  ” अशी अवस्था शेतकऱ्यांची भविष्यात होणार असल्याने हे काम होऊन देणे हि  शेतकऱ्यांच्या हिताची बाब असल्याने परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व असंख्य शेतकरी हजारच्या संख्येने उपस्थित राहून या कामाला विरोध करत आहे.

सरकारने सिमेंट काँक्रीट करण्याच अस्थिकरणाचा जो घाट घातला आहे. त्याला नाशिक जिल्ह्यातील निफाड .सिन्नर व अहिल्या नगर जिल्ह्यातील राहता .कोपरगाव या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आक्रमक पवित्र घेतला आहे व सदर काम बंद पाडण्याच्या दृष्टीने तालुक्यातील दहिवडी. उजनी. रामपूर .शहा .सोमठाणे. सांगवी .कारवाडी . भरतपुर. कोळगाव माळ.पाथरे , तसेच कोपरगाव तालुक्यातील पवारवाडी .हांडेवाडी. चासनळी कोळपेवाडी. मढी. शहाजापूर .परिसरातील अनेक गावातील शेतकरी यांनी एकत्र येऊन या कामाला तीव्र विरोध केला आहे….

Oplus_131072

ओसाड गावचा पाटील ओसाड होणार का ?

शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या सिमेंट अस्तरीकरणाच्या कामामुळे हजारो शेतकऱ्यांची शेती उध्वस्त होणार असून  भूगर्भीय पाण्याचा स्रोत यामुळे थांबणार आहे .याचा थेट परिणाम जमिनीतील पाणी पातळीवर होणार असल्याने शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी ओसाड व उजाड होणार असून सदर काम झाले तर बागायती शेती कोरडवाहू शेती होणार  गावाचे गाव ओसाड होणार व गावचे पाटील घेणार कोण ? याचे भविष्य दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्र घेऊन जागोजागी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

या प्रसंगी उपस्थिती
सोमनाथ पुंजाजी चांदगुडे, मुरलीधर घुमरे (सरपंच हांडेवडी), ज्ञानेश्वर डेंगळे ( मा. सरपंच रामपूर), संदीप धारणकर ( पो. पाटील),गोकुळ पवार, राहुल दंडवते, विश्वास गायखे, संदीप चांदगुडे, अशोक चांदगुडे, दत्तात्रय जाधव , दत्तात्रेय घुमरे, विक्रम नरोडे, नवनाथ नरोडे, ऋषिकेश गव्हाणे, भाऊसाहेब ब. चव्हाण, भाऊसाहेब का. चव्हान, नवनाथ चव्हान, कृष्णा चव्हान, सचिन चव्हाण, किसन चव्हान, श्रीकृष्ण नरोडे, कृष्णा पवार व हजारो शेतकरी उपस्थित होते…

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!