नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

या महामार्गावर भीषण अपघात दोन अपघातात तिघांचे बळी !

Nandgaon news

महामार्गावर भीषण अपघात – तीन दिवसांत तीन बळी

नांदगाव : नांदगाव-मनमाड रोडवरील राष्ट्रीय महामार्ग आता नागरिकांच्या प्रवासाला धोका निर्माण करीत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पानेवाडी येथील इंधन कंपनीजवळ झालेल्या अपघातात साकोरा गावचे समाधान हिरे (वय अंदाजे २५) या तरुणाचा मृत्यू झाला. समाधान मोटरसायकलवरून नांदगावकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

या आधी दोन दिवसांपूर्वी याच महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांनी जीव गमावला होता. त्यामुळे अल्पावधीतच तिघांचे बळी गेल्याने नागरिकांनी महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

रहदारीची वाढती गर्दी, वेगमर्यादेचे उल्लंघन, तसेच चौकांजवळील अपुऱ्या सुविधा यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

प्रशासन व शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका राहणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दिगंबर अहिरे आणि फकीर गांगुर्डे या दोघांचा दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुचाकी अपघातात मृत्यू झाला असून यांच्यासोबत असलेले दोघेजण गंभीर अवस्थेत आहे त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी पुन्हा मनमाड नजीक पानेवाडी इंधन कंपनी जवळ झालेल्या अपघातामध्ये अज्ञात वाहनाने दुचाकी ला जबरदस्त धक्का दिल्यानेदुचाकी स्वाराचा मृत्यू झालेला आहे अशा तीन दिवसांमध्ये दोन अपघातात तिघांचा मृत्यू आणि दोन गंभीर जखमी आहे त्यांना सध्या नाशिक मालेगाव येथे उपचार चालू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!