वेगवान मराठी : मारुती जगधने
[नांदगांव दि 27 ऑगस्ट 2025 ]नांदगाव येवला रोडलगतच्या मल्हारवाडी शिवारात दि . 27 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास वीज कोसळून एक मेंढी व तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला असून काही बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, नांदगाव नजीक मल्हारवाडी येथील डोंगरावर कांदा व्यापारी भूषण धूत यांच्या कांदा वखारीसमोर ज्ञानेश्वर म्हाळू शिंदे व त्यांचा मुलगा हे मेंढ्या चारत असताना अचानक गडगडाटासह वीज कोसळली. यात शिंदे यांच्या एक मेंढी व तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर काही बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच मल्हारवाडी गावच्या सरपंच अश्विनी मुकुंद खैरनार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित कुऱ्हे यांना संपर्क साधला. डॉ. कुऱ्हे व नानासाहेब काकळीज यांनी घटनास्थळी येऊन जखमी बकऱ्यांना औषधोपचार केले तसेच मृत जनावरांचे P M केले.
या घटनेत मेढपाळ ज्ञानेश्वर शिंदे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरपंच अश्विनी मुकुंदा खैरनार यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन प्रशासनाशी तातडीने संपर्क साधला.व प्रशासनाकडून नुकसानग्रस्त मेंढपाळांना भरपाई मिळावे अशी मागणी केली याबाबतची मौखिक माहिती तहसीलदार, तलाठी यांना देखील देणार आहे .



