स्मशानभूमीतील अंधारामुळे स्मशानातील मरण यातना !
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव [: दि 27 ऑगस्ट 2025 ]
गिरणानगर हद्दीतील हनुमाननगर येथील रहिवासी गणेश चौधरी यांचे वडील शंकरराव चौधरी यांचे दिनांक 27 ऑगस्ट रोजी निधन झाले. संध्याकाळी सुमारे सात वाजता त्यांचा अंत्यविधी नांदगाव येथील मुख्य स्मशानभूमीत पार पडला.
मात्र, या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या नातेवाईक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कारण स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी कोणत्याही दिव्यांची व्यवस्था नव्हती. विजेचा पुरवठा बंद असल्याने अंधारातच मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात अंत्यविधी पार पाडावा लागला.
शोकाकुल वातावरणात या गैरसोयीमुळे नागरिकांची नाराजी व्यक्त झाली. “मृतांच्या आत्म्यास शांती देण्यासाठी येतो, पण येथे स्मशानभूमीतल्या मरण यातना अजून किती दिवस सोसाव्या लागणार?” असा संतप्त सूर उपस्थितांनी व्यक्त केला.
नांदगाव शहरातील मुख्य स्मशानभूमीत प्रकाश व्यवस्था नसणे ही गंभीर बाब असून, नागरिकांनी प्रशासनाने तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
नांदगाव येथील मुख्य समशानातील मरण यातना मयताचे नातेवाईक नेहमीच सोसत असतात आणि अजूनही त्या सोबत आहे मात्र यात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही –
विशेष बाब :-
[ : – या ठिकाणी लावलेले पथदिवे भामटे चोरी करून घेऊन जातात लोखंडी पाईप कापून घेऊन जातात दिव्यांची तोडफोड करतात ही समस्या गेल्या कित्येक दिवसापासून आहे मात्र या भामट्यांवरती अद्याप कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाही .ते अजून मोकाट आहे ]



