नाशिक ग्रामीण

भावाने डोक्यात लाटणे मारल्याने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू..

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.२८ ऑगस्ट :- खेळता खेळता भावाने डोक्यात लाटणे मारल्याने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे घडली.

मयत बालकाचे नाव देवा विक्रम डोईफोडे (वय २ वर्ष, रा. कसबे सुकेणे) असे आहे. दि.२१ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरी खेळत असताना त्याच्या भावाने लाकडी लाटणे डोक्यात मारले. गंभीर जखमी अवस्थेत वडील विक्रम मोहन डोईफोडे यांनी त्याला तातडीने आडगाव येथील मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केले.

तेथे उपचार सुरू असताना दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४० वाजता डॉ. पारस शहा यांनी तपासून बालकाला मृत घोषित केले. या घटनेची नोंद काल ओझर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!