नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

रेल्वे स्टेशन लगत परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ; छोट्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण .

Nandgaon news

वेगवान मराठी : दि 21 मे 2026

नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या तीन दिवसांपासून एका टपरीवर सातत्याने चोरीच्या घटना घडत असून, या भुरट्या चोऱ्यांमुळे स्थानिक व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे टपरीचे फाळके उचकवून किंवा कुलूप तोडून आत हात घालत बिडी, सिगारेट, तंबाखू, गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे बटाटा चिप्स कुरकुरे तसेच रोख रक्कम लंपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ही चोरीची मालिका गेल्या तीन दिवसांपासून सुरू असून, रोज रात्री उशिरा हा प्रकार घडत असल्याने परिसरातील छोट्या व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे टपरीच्या फाटकाला जबरदस्ती उचकवून जे काही हाताला लागेल ते घेऊन पसार होत आहेत.
या प्रकारामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील छोटा व्यावसायिक असलेले अशोक ससाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी त्यांच्या टपरीतून सुमारे १ हजार ते १२०० रुपयांची रोख रक्कम तसेच अंदाजे ५ ते ७ हजार रुपयांपर्यंतच्या सिगारेट, बिस्किटे, गोळ्या, चॉकलेट, पाऊच व इतर खाद्यपदार्थ आणि व्यसनाच्या वस्तूंवर डल्ला मारला आहे.
वारंवार होत असलेल्या या चोरीमुळे छोट्या व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले असून, संबंधित भामट्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरीच्या घटनांचा तपास लावावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यानच्या मागील काळात याच भागातील काजी यांच्या खाद्यपदार्थ विक्रीच्या छोट्या हॉटेलमधून गॅस सिलेंडरची चोरी होणे याच ठिकाणातील बिडवे यांच्या दुकानातील सलून च्या साहित्याची चोरी होणे तसेच दीपक पवार यांच्या दुकानातील मोटार रिवाइंडिंग च्या जुन्या तांबपितळाची चोरी करणे हे प्रकारे या ठिकाणी यापूर्वी घडलेल्या आहे नव्याने पुन्हा याच भागामध्ये भुरट्याच्या सुरू झालेल्या आहेत याचा बंदोबस्त होण्याची मागणी होत आहे मात्र वरील ताज्या घटनेची पोलिसात कोणतीही नोंद झाली नाही .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!