लोकल बातम्या

साकोरा गावचा गौरव :

Nandgaon news

साकोरा गावाचा गौरव; पंजाबराव बोरसे व श्यामकांत बोरसे यांना “आदर्श गुणवंत कार्यकारी अभियंता” पुरस्कार
वेगवान मराठी : मारुती जगधने दिनांक 23 मे 2026
साकोरा ता. नांदगाव गावासाठी अतिशय अभिमानाचा क्षण ठरला असून, महावितरण कंपनीच्या वतीने पंजाबराव बोरसे आणि श्यामकांत बोरसे यांना “आदर्श गुणवंत कार्यकारी अभियंता” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आपल्या उत्कृष्ट कार्यकौशल्याने, प्रामाणिक सेवाभावाने आणि समाजाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी हा बहुमान प्राप्त केला आहे. वीज वितरण व्यवस्थेमध्ये जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे साकोरा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गावाचे नाव संपूर्ण परिसरात उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या यशामुळे युवकांनाही प्रेरणा मिळत आहे.
या सन्मानाबद्दल समस्त साकोरेकरांकडून पंजाबराव बोरसे आणि श्यामकांत बोरसे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!