गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला /दिनांक :11 मे :नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या निकालात येवला तालुक्यातील गुरुदत्त माध्यमिक विद्यालय धामोडा ने याही वर्षी बाजी मारली
एसएससी चा निकाल 100% लागला असून दरवर्षीची परंपरा या वर्षीही कायम राहिलेली आहे.
100 टक्के निकालाची परंपरा कायम मार्च 2025 मध्ये झालेल्या शालांत परीक्षेमध्ये इयत्ता दहावीचा गुरुदत्त माध्यमिक विद्यालय चा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचा मान प्रसाद भीमा येवले याने मिळवला त्यास 94 % मार्क मिळाले,
द्वितीय क्रमांक कुमारी भूमिका प्रवीण येवले 92.60%
तृतीय क्रमांक कुमारी वेदिका बाळासाहेब येवले 91.20%
तृतीय क्रमांक कुमारी वैष्णवी संदीप भड 90.80%
पाचवा क्रमांक कुमारी ईश्वरी मच्छिंद्र येवले 90.40% मार्क मिळून घवघवीत यश संपादन केले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक मा. रामदास ठमाजी गायकवाड सर्व संचालक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अर्जुन घोडेराव सर व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले
या विद्यालयात गेल्या पंचवीस वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी घडले गेले. अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत बरेच विद्यार्थी इंजिनिअर, मेडिकल ,सैन्य, पोलीस अशा विविध पदावर आहेत.
सर्व ग्रामस्थांच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री.प्रदीप दारुंटे,श्री.शशिकांत गायकवाड,श्री.शिवाजी भालेराव,श्री.सुधीर आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.
याविषयी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन घोडेराव यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव आम्ही करून घेतो, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून घेतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला जातो त्याचेच हे फलित असल्याचे सांगितले.विद्यालयात गेल्या 25 वर्षापासून हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जातो

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये