नाशिक ग्रामीण

नांदगाव नाग्या- साक्या धरण ओव्हर फ्लो?

Nandgaon pouse Pani news

नाग्या – साक्या धरण 90% क्षमतेने भरले .

वेगवान मराठी : दि  19 ऑगस्ट

 

मारुती जगधने

 

 

नांदगाव तालुक्यातील पांझण नदीवरील  नाग्या -सा क्या हे सुमारे 500 दशलक्ष घनफूट क्षमतेचे महत्वाचे धरण असून ते सध्या 90 टक्के क्षमतेने भरलेले आहे. यंदाच्या पावसाळ्यात उर्वरित दिवसांमध्ये झालेल्या पर्जन्यामुळे हे धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उजव्या आणि डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांना आवर्तनाचा मोठा लाभ होणार आहे.

 

 

या पाणीपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल तसेच पिकांच्या स्थिरतेला हमी मिळणार असल्याचा विश्वास कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे. स्थानिक शेतकरीसुद्धा या जलसाठ्यामुळे समाधान व्यक्त करत असून, रब्बी हंगाम यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

नाग्या साख्या धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाखालील उजव्या आणि डाव्या पाठ कालव्याला रब्बीचे आवर्तन सोडण्यात येते. यामुळे मालेगाव तालुक्यातील बारा ते पंधरा गावांना त्याचा लाभ होतो आणि नांदगाव तालुक्यातील पांझन साकोरा या गावांना देखील नांदगाव ग्रामीण या भागाला या अवर्तनाचा लाभ होतो मात्र नाग्या – नाक्या धरण हे  हिंगणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असते परंतु हिंगणवाडी गावासाठी या धरणाच्या पाठ कालव्याचा कोणताही लाभ मिळत नाही . त्यामुळे धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था हिंगणवाडी ग्रामस्थांची झाली आहे .

 

या ग्रामस्थांनी वारंवार ना ग्या – साक्या  पाठ कालव्याचे पाणी हिंगणवाडी गावासाठी सिंचनाला मिळावं ही मागणी करून देखील त्या मागणीचा पुरेसा पाठपुरावा होताना दिसत नाही . त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाग्या – साक्या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या हिंगणवाडी ग्रामपंचायतीसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो . ही शोकांतिका धरणाच्या पायथ्याशी असलेले गावाची आहे .

 

दरम्यान नाग्या – साक्याहे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची स्थितीत असून आता या धरणावरील नांदगाव आणि चांदवड तालुक्यातील 42 खेडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊ शकते कारण की मागील काळामध्ये धरणातील अत्यल्प पाणी साठ्यामुळे ही योजना रखडली होती आता या योजनेचा 42 गावातील नागरिकांना लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. यासाठी प्रशासनाने भगीरथ प्रयत्नांची गरज आहे .माजी आमदार संजय पवार यांच्या कालावधीमध्ये 42 खेडी योजना पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात आली होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!