
वेगवान मराठी : ” दि . ९ डिसेंबर २०२५ “
नांदगाव (नाशिक ग्रामीण) : नांदगाव शहरातील हुतात्मा चौक परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने पोलीस स्टेशनला लागून असलेल्या जुन्या इमारतीच्या लोखंडी गेटला गळफास घेऊन आत्म हत्या केली
घटना ८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा घडली. घटनेनंतर काही वेळाने, ९ डिसेंबर रोजी रात्री ०१:२४ वाजता, नांदगाव पोलीस ठाण्यात याची अधिकृत नोंद जी.डी. क्रमांक ००४ अशी करण्यात आली. या प्रकरणात अकस्मात मृत्यू रजि. क्रमांक ९५/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
- मयताचे नाव: रवींद्र अशोक सोळसे
- वय: ३२ वर्षे
- रहिवासी: बाणगाव बु., ता. नांदगाव
- फिर्यादी :विशाल नाना सोळसे (वय २४ वर्षे) — मृत व्यक्तीचा चुलत भाऊ
पोलीस फिर्यादी त दिः ८ डिसेंबर रोजी रात्री उशीरा, रवींद्र सोळसे हे दारूच्या नशेत हुतात्मा चौकाजवळील भूमी अभिलेख कार्यालयासमोरील एका जुन्या इमारतीत गेले. तेथील लोखंडी चॅनलच्या स्लाइडिंग गेटला त्यांनी गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना फिर्यादीन दिली.
घटना लक्षात येताच त्यांची आई विमल सोळसे आणि दाजी संतोष अहिरे यांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, नांदगाव येथे नेले. तथापि, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले .
या घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यू / संशयास्पद मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन आवारात त्रस्त नागरीक वेगवेगळ्यास्वरूपात आंदोलन करतात पण या तरु णाने या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या का केली ?
सदर घटणेतील मयताचे नातेवाईक आर्थिक परिस्थितीने अत्यंत नाजुक आहेत मयताच्या पश्चात आई , पत्नी, 3 मुल असा परिवार आहे बाणगांव येथे शोकाकुल वातावरणात मयताचा अंत्यवधी करण्यात आला .
नांदगावच्या पोलीस डायरील प्रथमच हुतात्मा चौकाची नोंद झाली ?



