नाशिक ग्रामीण

शिवसेने चे 4 नगरसेवक बिनविरोध

Nandgaon news

वेगवान मराठी : मारुती जगधने

” दि : 20नोव्हेंबर 2025 ”

नांदगाव नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत आज, दिनांक २० नोव्हेंबर रोजी महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज अधिकृतपणे मागे घेतला. आमदार सुहास कांदे, माजी सभापती विलासभाऊ अहिरे व नूतन कासलीवाल यांच्या विनंतीचा मान राखत राजेशजी कवडे यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सागर हिरे यांना जाहीर पाठिंबा दिला.

दुपारी नांदगाव नगरपालिकेत आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेतील औपचारिकता पूर्ण करत राजेश कवडे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे शिवसेना गटाला निवडणुकीत बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना गटातील चार  नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात —

  • प्रभाग क्रमांक ६ अ : किरण देवरे
  • प्रभाग क्रमांक ६ ब : वंदना चंद्रशेखर कवडे
  • प्रभाग क्रमांक २ अ : दीपक पांडव
  • प्रभाग क्रमांक आठ ब खान जुबेदाबी गफार खान

या घटनांमुळे नांदगावमधील निवडणूक वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून पुढील राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!