पत्रकारांवर हल्ल्याचा सिन्नरच्या पत्रकारांनी केला निषेध, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.
शनिवारी वार्तांकनासाठी पोहोचलेल्या पत्रकारांमध्ये योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे यांना बेदम मारहाण करण्यात आली. प्राथमिक उपचारासाठी तिघांनाही त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले होते त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या एका पत्रकाराला नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते.सतत पत्रकारांवरील हल्ले करण्याचे प्रमाण वाढल्याने या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज व्हॉइस ऑफ मीडिया सिन्नर तालुक्याच्या वतीने सिन्नर तालुक्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख साहेब, सिन्नर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सिन्नर MIDC पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया सिन्नर तालुकाध्यक्ष अक्षय गायकवाड , व्हाईस ऑफ डिजिटल विंगचे तालुका अध्यक्ष योगेश म्हाळणकर यांच्यासह सिन्नर तालुक्यातील पत्रकार संदीप ठोक,भाऊसाहेब जाधव,बाळासाहेब सोनवणे,भानुदास बैरागी,योगेश गुरूळे,नितीन शिंदे,यामिन सय्यद, दत्ता जोशी,रोशन पाटोळे,सुनील वाघ,सागर महल्ले आदी पत्रकार उपस्थित होते.



