सहकारी अधिकाऱ्यांची लालच काही थांबेना … कार्यवाही सुरू असूनही महाराष्ट्रात सहकारी कार्यालयात सरकारी बाबू चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच करीत नसल्याचे लक्षात आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कठोर कार्यवाही करीत बेधडक कारवाईचा बडगा उगारला असला तरी भ्रष्टाचाराची पाळे मुळे खोलवर पसरल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गाची हिंमत वाढल्याने चिरीमिरी घेतल्याशिवाय होतच नाही ही बाब समोर येताना सातत्याने दिसत आहे… सिन्नर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बेधडक कार्यवाही …..
या विभागाने सिन्नर तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागातील नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर वय 51 यांना तब्बल अडीच लाख रुपये लाज घेताना रंगेहाथ पकडले आहे. जोडी येथील तक्रारदार यांचा मुलगा व सुनाच्या नावावरील गट नंबर 499 मौजे दोडी खुर्द तालुका सिन्नर या जमिनीच्या फेरफार नोंद क्रमांक 33 45 मंजूर करण्यासाठी या तहसीलदाराने तक्रारदादाकडे तब्बल दहा लाख रुपये ची मागणी केली होती तर जोडीनंतर अखेर अडीच लाखावर सौदा ठरवण्यात आला व दिनांक नऊ डिसेंबर रोजी सोपान हॉस्पिटल समोर लाज स्वीकारण्याचे ठरल्याने लाल प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी अतिशय योजनाबद्ध सापळात असून तक्रारदाराकडून पंचा समक्ष अडीच लाख रुपये रक्कम स्वीकारतांना नायब तहसीलदार संजय धनगर यांना करण्यात आली मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 453 / 2025 नोंदविण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम सात अंतर्गत पुढील कार्यवाही चालू आहे… या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांनी मार्गदर्शन केले सर्च ऑपरेशन करण्यासाठी पोलीस हवालदार प्रमोद पाळदे. संदीप वनवे. शरद हेंबाडे. युवराज खांडवी.यांनी विषेश परीश्रम घेतले आहे.. या कारणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे असले तरी राज्यात अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराच्या घटना वारंवार घडत आहे याचा अर्थ या अधिकाऱ्यांना कोणाचा धाकच होणार नाही का असा प्रश्न यावेळेस उपस्थित होत आहे. कारण आतापर्यंत नांदेड मध्ये महिला नायब तहसीलदार सुमन कुरळे यांना 5700 घेताना रंगात पकडली मोताळा तालुका तहसीलदार हेमंत पाटील यांना दोन लाख रुपयाची लाज घेताना अंगात पकडले. धुळ्यातही लाल लुचपत विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.. महिला तलाठी मोमीन व रोजगार सेवक वाडिलाल पवार आणि दादा दामु जाधव यांना 25 हजार रुपये लाज घेताना रंगेहाथ पकडले आहे.. या विभागामार्फत सतत कारवाई करण्यात येते.. सरकारी बाबूं ची पैशाची हवस काही कमी होतांना दिसत नाही..
भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....