
वाखारी विविध कार्यकारी सोसायटीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड
वेगवान मराठी : मारुती जगधने
॥ दि 16 ऑक्टोंबर 2025 ॥
वाखारी ता . नांदगांव वाखारी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी . बबनराव माणिक चव्हाण यांची तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी तात्यासाहेब वाल्मीक चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवड प्रक्रियेस माजी जिल्हा परिषद गटनेते . राजेंद्र पवार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाडचे माजी सभापती अंकुश कातकडे हे उपस्थित होते.
या वेळी बाळनाथ धनाजी चव्हाण, कैलास वामन चव्हाण, कैलास श्रावण चव्हाण, प्रल्हाद कोळजी चव्हाण, समाधान रामचंद्र चव्हाण, कौतिक मंदा काकळीज, आशाबाई आण्णासाहेब चव्हाण, केदाबाई लक्ष्मण काकळीज, संजय वाल्मीक काकळीज, गोरख पुंडलिक शेरमाळे, भाऊसाहेब अर्जुन सोनवणे तसेच सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते.
नवीन पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.



