सावधान — पुढील पाच तासांत मेघगर्जनेसह या जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात.. सलग तीन दिवस पाऊस मुक्कामी.
जिल्ह्यासह सिन्नर तालुक्याला रात्रभर पावसाने झोडपले
वेगवान नाशिक / WEGWAN nashik
नाशिक / सिन्नर ,; भाऊसाहेब हांडोरे
दि. 25 ऑक्टोबर 2025 मागील महिन्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते व संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घालत शेतकरयांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले त्या प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.. त्याला तोंड देत असतानाच पुन्हा पावसाने डोक वर काढत जवळपास सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे..
सिन्नर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस… सर्वत्र हाहाकार
तालुक्यात रात्रभर मुक्कामी असलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून रात्री आठच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पाऊस रात्रभर मुक्कामी असुन मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून बारा तास उलटून गेले तरी पावसाचा जोर कायम आहे…
सध्या, भारताच्या आग्नेय आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्रावर ९२A हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, जो उत्तर-वायव्येकडे सरकत आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता कमी आहे आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्राजवळ येऊन कमकुवत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २४ ऑक्टोबरच्या सुमारास मध्य आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे, जी २६-२७ ऑक्टोबरपर्यंत वेगाने वादळात रूपांतरित होऊ शकते. २८ ऑक्टोबरच्या सुमारास मछलीपट्टनम आणि काकीनाडा किनाऱ्यांदरम्यान कमकुवत चक्रीवादळाच्या रूपात ती जमिनीवर धडकू शकते.
ऑक्टोबरच्या सुमारास मछलीपट्टनम ते काकीनाडा किनाऱ्यादरम्यान ते कमकुवत चक्रीवादळाच्या रूपात जमिनीवर धडकू शकते.
यानंतर, ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण चीन समुद्रातून आणखी एक प्रणाली विकसित होऊ शकते, परंतु तिचा विकास आणि मार्ग ट्रॅक अद्याप अनिश्चित नाही
सर्वात जलद हवामान अंदाजा करता चॅनल
पुढील ३ तासांत मध्य व उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर,धुळे,जळगाव,नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे व मुसळधार पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताआहे.नागरिकांनी सतर्क राहावे.
तर पुढील ३ दिवस मेघगर्जनेसह पावसाचा जोर कायम राहील संभाजीनगर,बीड,धुळे,हिंगोली,जळगाव,जालना,लातूर,नांदेड,नंदुरबार,नाशिक,परभणी येथे विजांसह वादळ व ताशी ३०-४० किमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्यातच पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार उडाला आहे व अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे.. साधारणतः हा पाऊस 28 ऑक्टोबर पर्यंत राहील असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे..



