परतीच्या पावसानंतर आता मोठं संकट, पुन्हा हे चक्रीवादळ २५० च्या वेगाने…

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि.३ ऑक्टोबर २०२५ :
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतानाच आता अरब सागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळ “शक्थी”ने धोका वाढवला आहे. पुढील २४ तासांत हे वादळ अधिक तीव्र होऊन “सीव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म” मध्ये परिवर्तित होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारत मौसम विभागाच्या (IMD) ताज्या माहितीनुसार, ‘शक्थी’ हे वादळ सध्या द्वारका (गुजरात) पासून अंदाजे २५० किमी अंतरावर असून पश्चिम-दक्षिणपश्चिम (WSW) दिशेने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर सौराष्ट्र आणि कच्छ भागासाठी आज “लाल (Red Alert)” जारी करण्यात आला आहे. या भागात अतिशय भारी पावसाचा अंदाज आहे. तर उद्या (४ ऑक्टोबर) “नारंगी (Orange Alert)” जारी करून मुसळधार पाऊस व वीजांचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ ‘शक्थी’मुळे सौराष्ट्र – कच्छ प्रदेशात पुढील दोन दिवस गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धोक्याचे अंदाज :
● किनारी भागात तुफानी वारे ६५ ते ८५ किमी/ता वेगाने वाहण्याची शक्यता.
● समुद्रस्थिती अत्यंत खडतर; नौकाविहार व मासेमारी धोकादायक.
● वीज, झाडे उन्मळणे व पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता.
IMD व प्रशासनाच्या सूचना :
● किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
● समुद्रात जाणे व मासेमारी टाळावी.
● स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचना सतत तपासाव्यात.





