नाशिक ग्रामीण

गोरक्षकांनी वाचविले कत्तलीसाठी जाणाऱ्या ८ गोवंशाचे प्राण; पोलिसात गुन्हा दाखल

गोरक्षकांनी वाचविले कत्तलीसाठी जाणाऱ्या ८ गोवंशाचे प्राण; पोलिसात गुन्हा दाखल
मनोज वैद्य / देवळा 

दिनांक १३ ऑगस्ट २०२५
देवळा सौंदाणे रस्त्यावरील धोबीघाट शिवारात लासलगाव व देवळा येथील गोरक्षकांच्या टीमने गोवंशाची वाहतूक करणारी एक पिकअप पकडून त्यातून ८ गोवंशांची सुटका केली आहे.

 

सदर प्रकारांना बाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्राणिन फाउंडेशनच्या अध्यक्ष नेहादीदी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गोरक्षकांनी आज बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास देवळा तालुक्यातील देवळा येथून एक पिकअप वाहनाचा पाठलाग केला, मात्र सदर वाहन चालक थांबायला तयार नव्हता, गोरक्षकांनी सापळा रचत ते वाहन शेवटी देवळा सौंदाणे रस्त्यावरील धोबीघाट येथे थांबवले, मात्र तेवढ्यात चालक गाडी सोडून पसार झाला.


त्यानंतर गोरक्षकांनी गाडीची झाडाझडती घेतली असता सदर गाडीमध्ये ४ गायी व ४ गोऱ्हे असे ८ गोवंश अत्यंत क्रूरतेने गाडीत भरून नेले जात असल्याचे उघडकीस आले. सदर घटनेची माहिती देवळा पोलिसांना दिल्यानंतर देवळा येथील गोरक्षक योगेश आहेर यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलिसात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात २ लाख रुपये किमतीच्या पिकअप, ४७ हजार ५०० रुपयांचे गोवंश असा २लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या गोवंशाला उमराणे येथील गोशाळेत पालन पोशन करण्यासाठी पाठवण्यात आले असून सदर प्रकरणाबाबत देवळा पोलीस स्टेशनचे एएसआय खुरासने हे अधिक तपास करीत आहेत.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!