नाशिक शहर

बायकोला गुंगीचे औषध पाजले, बार मध्ये नाचविले,

वेगवान नाशिक

वेगवान नाशिक / विशेष  प्रतिनिधी

पंचवटी, ता. 1 आॅगस्ट2025  । पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना हिरवाडी परिसरात उघडकीस आली आहे. पत्नीला गुंगीकारक औषध देत तिचे अश्लील व्हिडीओ काढून, ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करून जबरदस्तीने डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप पीडित पत्नीने केला आहे.

याप्रकरणी पतीसह त्याच्या मित्राविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला बनारसी नगर, हिरवाडी येथील फ्लॅट नं. २०२, गुरुकृपा हाइट्स सोसायटी मध्ये राहणारी असून, तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०२२ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत तिचा पती पवन राजेंद्र वाडेकर आणि त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे यांनी संगनमताने गुंगीकारक औषध देऊन तिला मानसिक व शारीरिक पद्धतीने गुलाम बनविले.

या काळात तिला बेंगलोर व सोलापूर येथे नेऊन, तिचे अश्लील व्हिडीओ चोरून काढण्यात आले. नंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, आरोपींनी तिला वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण केली आणि डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले.

या प्रकारामुळे पीडित महिलेचे शारीरिक व मानसिक शोषण झाले असून, तिने अखेर धाडस करून पंचवटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सदर दोघे आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!