महाराष्ट्र,देश

गिरणा धरणातून २,४७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nandgaon news

गिरणा धरणातून २,४७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वेगवान मराठी
चाळीसगाव, दि. ३१ जुलै : गिरणा मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्याने गिरणा धरणातून शुक्रवारी (दि. ३१ जुलै) दुपारी २ वाजल्यापासून २,४७६ क्युसेक (७०.०७ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे वक्रद्वार क्रमांक १ व ६ प्रत्येकी ३० सेंमीने उघडण्यात आले असून नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे.

प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक आणखी वाढल्यास धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग परिस्थितीनुसार कमी किंवा वाढविण्यात येऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गिरणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी तसेच पशुपालकांनी नदीपात्रात किंवा नदीकिनारी जाणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!