
नांदगाव न्यायालयात लोकअदालत; ९४ प्रकरणे निकाली
दिवाणी, फौजदारी, वीजबिल वसुलीसह विविध प्रकरणांतून १० लाख ५६ हजार ६१० रुपयांची वसुली
वेगवान मराठी ;मारुती जगधने
दि. १५ September.२०२६ :नांदगांव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत दावा दाखलपूर्व तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
लोकअदालतीत दावा दाखलपूर्व ६० आणि न्यायालयात प्रलंबित ३४, अशी एकूण ९४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये दिवाणी दावे, वीजबिल वसुली, बँक, ग्रामपंचायत तसेच फौजदारी दंडाच्या प्रकरणांचा समावेश होता. या विविध प्रकरणांतून एकूण १० लाख ५६ हजार ६१० रुपयांची वसुली करण्यात आली.
लोकअदालतीच्या पॅनेलचे प्रमुख म्हणून न्यायाधीश जे. एम. अग्निहोत्री यांनी काम पाहिले, तर सदस्य म्हणून विधिज्ञ ॲड. शिवाजी पाटील यांनी सहकार्य केले.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहायक अधीक्षक पी. डी. येवले, लघुलेखक एच. एल. पाटील, वरिष्ठ लिपिक पी. डी. पाटील व एस. बी. चव्हाण, कनिष्ठ लिपिक एम. बी. शेळके, आय. के. भिंगारे, एस. डी. आहेर, व्ही. बी. पवार तसेच शिपाई टी. एन. जाधव यांनी परिश्रम घेतले.
यावेळी नांदगाव वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. भरत पी. जाधव, सचिव ॲड. शेखर पाटील, सहसचिव ॲड. राहुल राऊत तसेच सदस्य ॲड. ए. के. शिंदे, ॲड. एस. एम. वाळेकर, ॲड. सचिन साळवे, ॲड. अक्षय कासलीवाल, ॲड. टी. यू. राठोड व इतर वकिलांनी सहकार्य केले.
फोटो कॅप्शन : नांदगाव न्यायालयात आयोजित लोकअदालतीप्रसंगी न्यायाधीश, विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी.



