नांदगावात अतिक्रमणाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा
घरालगतचा १० फुटी रस्ता मोकळा करून रस्ता व गटार बांधण्याची मागणी; मुख्याधिकाऱ्यांकडे चार वेळा अर्ज करूनही दखल ?
: वेगवान मारठी :मारुती जगधने
नांदगाव, दि. १५ सप्टेंबर २०२६: नांदगाव शहरातील आपल्या मालकीच्या घराजवळ रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवून सुमारे १० फुटी रस्ता मोकळा करावा, तसेच त्यावर रस्ता व गटार बांधून द्यावे,
मांजी नगरसेवक संतोष गुप्ता यां
नागरिकाने नांदगाव नगरपरिषदेविरोधात १५ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत संबंधित नांदगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे यापूर्वी चार वेळा अर्ज करूनही मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. घराजवळील रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीसह नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अतिक्रमण हटवून १० फुटी रस्ता खुला करावा, रस्त्याचे बांधकाम करावे आणि गटाराची व्यवस्था करावी, अशी मागणी उपोषणकर्त्याने केली आहे. वारंवार अर्ज करूनही प्रश्न सुटला नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन संबंधित जागेची पाहणी करून अतिक्रमणाबाबत योग्य ती कार्यवाही करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फोटो कॅप्शन : नांदगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषणास बसलेले नागरिक.



