राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,युवक तालुकाध्यक्ष पदी कुणाल बोरसे यांची निवड.
Nandgaon news

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,युवक तालुकाध्यक्ष पदी कुणाल बोरसे यांची निवड.
वेगवान मराठी ; दि 3 July2026
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख ह्यांच्या नेतृत्वाखाली, प्रदेश प्रभारी नताशा आव्हाड यांच्या हस्ते आणि युवक जिल्हाध्यक्ष शाहू राजे शिंदे यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुका युवक अध्यक्षपदी कुणाल बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली असून येवला येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले. कुणाल बोरसे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत कार्यरत असून पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या अभ्यास शिबिरात आणि आंदोलनात सक्रिय असतात,सदर निवडीबद्दल आमदार रोहित दादा पवार,खासदार भगरे सर,आमदार सुनीलजी भुसारा,जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील,युवक जिल्हाध्यक्ष शाहू राजे शिंदे यांनी अभिनंदन केले आहे,बी ई मेकॅनिक शिक्षण झालेल्या ह्या तरुणावर शरद पवार साहेब यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव असून गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या युवकाची पक्षातर्फे सार्थ निवड झाल्याची भावना तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी व्यक्त केली आहे.



