नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

पिंपरखेड रेल्वे गेटजवळ भीषण अपघात; माणिकपुंज येथील दोन जेसीबी चालकांचा मृत्यू

Nandgao news

पिंपरखेड रेल्वे गेटजवळ भीषण अपघात; माणिकपुंज येथील दोन जेसीबी चालकांचा मृत्यू

वेगवान मराठी | प्रतिनिधी : मारुती जगधने
दिनांक : १ जुलै २०२६
पिंपरखेड रेल्वे गेटजवळ भीषण अपघात; माणिकपुंज येथील दोन जेसीबी चालकांचा मृत्यू
नांदगाव–चाळीसगाव मार्गावरील पिंपरखेड रेल्वे गेटजवळ ३० जून रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात माणिकपुंज (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण माणिकपुंज गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदगावहून चाळीसगावकडे जाणाऱ्या लक्झरी बसची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रमेश कोल्हे आणि सुनील सोपान गोराणे (रा. माणिकपुंज, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांचा समावेश असून, दोघेही व्यवसायाने जेसीबी चालक होते. त्यांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. अपघातातील लक्झरी बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून बसचालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
या अपघातामुळे माणिकपुंज गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, दोन्ही तरुणांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास नांदगाव पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!