नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

पिंपराळे चौफुलीत मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न; पाच जणांविरुद्ध गुन्हा अंतर्गत वादातून पिंपराळे चौफुली येथे एका व्यक्तीस मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू विकीवरून दोन गटातील भानगडी चव्हाय्यावर येताच पोलीसांनी मुसक्या आवळल्या .

Nandgaon news

पिंपराळे चौफुलीत मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न; पाच जणांविरुद्ध गुन्हा
अंतर्गत वादातून पिंपराळे चौफुली येथे एका व्यक्तीस मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारू विकीवरून दोन गटातील भानगडी चव्हाय्यावर येताच पोलीसांनी मुसक्या आवळल्या .

वेगवान मराठी : मारुती जगधने दि. ११ मे २०२६
याप्रकरणी गौतम बंडु निकम (वय 43, व्यवसाय शेती, रा. पिंपराळे चौफुली, ता. नांदगाव) यांनी फिर्याद दिली असून, CCTNS गु.र.नं. 200/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109, 351(2)(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास फिर्यादी हे पिंपराळे चौफुली येथील बाळू बोरकर यांच्या हॉटेलमध्ये दारू खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीला जमिनीवर पाडून संशयीत आरोपी बाळू राजाराम बोरकर यांनी त्यांच्या गळ्यावर हाताने दाब देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये बाळू राजाराम बोरकर, शांताबाई राजाराम बोरकर, राजाराम भिमा बोरकर, नेत्रा बाळू बोरकर तसेच बाळू बोरकर यांचा मुलगा यांचा समावेश असून सर्व आरोपी पिंपराळे चौफुली येथील रहिवासी आहेत.

प्रकरणात संशयीत आरोपी क्रमांक 1 बाळू राजाराम बोरकर यांना 10 मे 2026 रोजी सकाळी 10:05 वाजता अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन बोलावण्यात आली असून ई-साक्ष (SID) द्वारे पुरावे संकलित करण्यात आले आहेत. पुढील तपास पोनिरी भदाणे करीत असून, दाखल अंमलदार म्हणून ASI सानप यांनी काम पाहिले.

पोलीस स्टेशनल आगलावण्या चा प्रयान ?
नांदगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करत पोलीस ठाण्यातच आग लावून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 9 मे 2026 रोजी रात्री 11:45 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पो .शी . 1126 आशिष मनोहर वागळे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार CCTNS गु.र.नं. 199/2026 भारतीय न्याय संहिता कलम 55, 283, 226, 351 (2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयीत आरोपींमध्ये बाळू राजाराम बोरकर, त्यांची पत्नी, मुलगा, राजाराम भीमा बोरकर तसेच बाळू बोरकर यांची आई यांचा समावेश आहे. सर्व आरोपी पिंपराळे चौफुली, ता. नांदगाव, जि. नाशिक येथील रहिवासी आहेत.

फिर्यादीनुसार, संशयात आरोपी हे नांदगाव पोलीस ठाण्यात आले व “आत्ताच्या आत्ता आमची तक्रार घ्या, अन्यथा आम्ही येथेच आग लावून आत्महत्या करू,” अशी धमकी दिली. त्यावेळी आरोपींच्या मुलाने दोन एक-लिटरच्या बाटल्यांमध्ये पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ आणून दिला. त्यानंतर आरोपींनी अंगावर पेट्रोल ओतून पोलीस ठाण्यात आग लावण्याची धमकी देत गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन बोलावण्यात आली असून, ई-साक्ष (E-Evidence) देखील संकलित करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.

तिसऱ्या घटणेत

नांदगाव तालुक्यातील पिंपराळे चौफुली येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका हॉटेल व्यावसायिकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशन येथे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजाराम भीमा बोरकर (वय 70, व्यवसाय हॉटेल, रा. पिंपराळे चौफुली, ता. नांदगाव) यांचे पिंपराळे चौफुली येथे हॉटेल आहे. दिनांक 9 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास आरोपी गौतम बंडू निकम व निवृत्ती चिमा शिंदे (दोघेही रा. पिंपराळे चौफुली) हे फिर्यादीच्या हॉटेलवर आले. मागील भांडणाचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत हाता-चापट्यांनी मारहाण केली.
तसेच फिर्यादीस जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. हा वाद सोडविण्यासाठी फिर्यादीची सून मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपींनी तिलाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच “आमच्या नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशन येथे CCTNS गु.र.नं. 197/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 109, 351(2)(3), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले .

पोलीस ठाणे: नांदगाव पोलीस स्टेशन, जि. नाशिक
दिनांक: 10/05/2026

CCTNS गु.र.नं.: 199/2026
भारतीय न्याय संहिता कलम 55, 283,226 351 (2)(3),3(5) प्रमाणे

फिर्यादी: पोशी 1126 आशिष मनोहर वागळे नेमणूक नांदगाव पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण मो.क्रमांक.9762627478

संशयीत आरोपी: 1) बाळू राजाराम बोरकर 2) बाळू बोरकर यांची पत्नी 3) बाळू बोरकर यांचा मुलगा 4) राजाराम भीमा बोरकर 5) बाळू बोरकर यांची आई सर्व राहणार पिंपराळे चौफुली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक.

अ.घ.ता.वेळ ठिकाण: दिनांक- 09/05/2026 रोजी रात्री 11/45 वाजेच्या सुमारास नांदगाव पोलीस ठाणे येथे ता.नांदगाव जि.नाशिक

अ.दा.ता.वेळ: दिनांक- 10/05/2026 रोजी 07/20 स्टे.डा.न. 05/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!