लोकल बातम्या

भारतीय सैनिकांना राखी बांधून साजरा केला स्वातंत्र्य दिन

भारतीय सैनिकांना राखी बांधून साजरा केला स्वातंत्र्य दिन

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला :दिनांक 17ऑगस्ट /भारताचा ७९ व स्वातंत्र्य दिन जि प शाळा महादेववाडी, सायगाव ता येवला येथे सालाबादप्रमाणे साजरा करण्यात आला. माजी सरपंच गणपतराव खैरनार, माजी सरपंच काशिनाथ ढाकणे, माजी पंचायत समिती सभापती दगु आव्हाड, तंटा मुक्ती अध्यक्ष उस्मान भाई शेख, उपसरपंच गणेश माळी, माजी उपसरपंच मीना खुरसने, सुभेदार विजय पठारे, वर्तमान संघटना अध्यक्ष शरद लोहकरे, शाळा व्य स अध्यक्ष भाऊसाहेब ढाकणे, उपाध्यक्ष योगेश बंडेराव उशीर, माजी अध्यक्ष गणपत इप्पर, रतन उशीर, विष्णू उशीर तसेच ग्रामस्थ, पालक यांच्या उपस्थितीत सायगाव ग्रामपंचायत च्या ग्रा पं सदस्या रेखा देविदास जानराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला..
यावेळी सायगाव ची आन बाण शान आणि गावचा अभिमान असणारे सुभेदार मेजर विजय पठारे यांच्या हाताला शाळेच्या शिक्षिका सौ शारदा आहिरे मॅडम यांनी राखी बांधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. तसेच ग्रा पं सदस्या रेखा जानराव यांनी देखील उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पूजन केले.
त्यानंतर अमली पदार्थ सेवन करू नये यासाठी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांनी शपथ घेतली.
हाताची खडी व बैठी कवायत होऊन… *जलवा तेरा जलवा जलवा* या गाण्यावर लेझीम घेण्यात आली.. अतिशय नयन मनोहर अशी कवायत झाल्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यानंतर सुभेदार श्री विजय पठारे यांनी विद्यार्थ्यांना भावी देशाचे भवितव्य म्हणून संबोधित केले. तर वर्तमान कामगार संघटना अध्यक्ष शरद लोहकरे यांनी देखील मुलांनी केलेले कवायत संचलन, भाषणे यांचे तोंड भरून आपल्या भाषणातून कौतुक केले. उपस्थित पालक यांनी शाळेला लागणारी all in one असणारी साउंड सिस्टीम देऊ केली. शाळेला श्रीम शारदा आहिरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापक देविदास जानराव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आली. कवायत संचलन साठी मुख्याध्यापक देविदास जानराव सर, उपशिक्षिका श्रीम शारदा आहिरे मॅडम, युवा प्रशिक्षणार्थी अरुण जानराव सर यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. तसेच पालक व शा व्य समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी खूप सहकार्य केले.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!