नाशिक ग्रामीण

भरधाव टाटा नेक्सॉनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; मनिकपुंज फाट्याजवळील भीषण अपघात

Nandgaon news

भरधाव टाटा नेक्सॉनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; मनिकपुंज फाट्याजवळील भीषण अपघात
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि 9 मे 2026
​नांदगाव:चांदवड चाळीसगाव नॅशनल हायवे वरती अपघातांचा सिलसिला चालू आहे या आठवड्यामध्ये दोन गंभीर अपघातामध्ये दोघा व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहे नॅशनल हायवे क्रमांक 753 वरती भर दवाखाने चालणारी वाहने आणि रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झाडपे झुडपे यामुळे बसणारे फटके वाहनाचा जाणारा तोल यामुळे होणारे अपघात .अपघाताच्या गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत आहे .चाळीसगाव चांदवड नॅशनल हायवे हा या मार्गावरील नागरिकांना शाप आहे की काय असा प्रश्न पडलाय कारण की हा मार्ग सुरू होत असतानाच जळगाव खुर्द येथे रस्ता बांधकाम सुरुवातीलाच रस्त्या मार्गातील काम करणाऱ्या वाहनांच्या धडकेमध्ये दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे .

नांदगाव-चाळीसगाव रोडवर मनिकपुंज फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा नेक्सॉन कारने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार संतोष लक्ष्मण मेंगाळ (वय ४२) यांचा गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (७ मे २०२६) सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास मृत संतोष मेंगाळ हे त्यांच्या प्लॅटिना मोटारसायकलने (क्र. एम.एच. ४१ बी.वाय. ६१२५) नांदगावहून कुसुमतलेकडे जात होते. यावेळी चाळीसगाव बाजूकडून नांदगावच्या दिशेने अत्यंत वेगाने येणाऱ्या टाटा नेक्सॉन कारने (क्र. एम.एच. १२ यु.एफ. ३५९६) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

​ही धडक इतकी भीषण होती की, संतोष मेंगाळ यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र जखम खोल असल्याने त्यांचा मृत्यू झाला.

​पोलीस कारवाई
​या प्रकरणी मृत व्यक्तीचे भाऊ भावराव लक्ष्मण मेंगाळ (रा. कुसुमतले, ता. नांदगाव) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टाटा नेक्सॉन कारच्या चालकाविरुद्ध (नाव अद्याप समजू शकलेले नाही) भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

​दाखल कलमे:

​BNS कलमे: १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), २८१ (बेदरकारपणे गाडी चालवणे), ३२४(४), १२५(ए), १२५(बी).
​मोटार वाहन कायदा: कलम १८४, १७७.
​नांदगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, तपास अंमलदार म्हणून ‘अलगत’ आणि ‘चव्हाण’ काम पाहत आहेत.

दरम्यान मागील सहा दिवसापूर्वी नांदगाव मनमाड नॅशनल हायवे वरती कार आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी ठार झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी भरदा व्याघाने चालणारे ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर कोणते झाला होता मात्र त्यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही

या आठवड्यामध्ये साधारण तीन अपघात झाले तीन अपघातामध्ये दोघांना प्राण गमवावे लागले चाळीसगाव चांदवड नॅशनल हायवे या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते त्यामुळे भरदा वेगाने लोक वाहन वाहन चालवत असतात आणि त्यामध्ये अपघात होऊन वाहनधारकांचे प्राण गमावले जात आहे नांदगाव नदी पोखरी शिवारामध्ये झालेले अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार झालेला आहे तर चार चाकी वाहनधारक हा पसार झालेला आहे ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!