
जनता विद्यालय शिरवाडे वाकद शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के
शिरवाडे वाकद :- जनता विद्यालय, शिरवाडे वाकद या शाळेचा यंदाच्या दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेमध्ये प्रणव संभाजी सोनवणे याने ८६.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मानसी प्रल्हाद शिंदे हिने ७९.६० टक्के गुणांसह द्वितीय, रोशन बाळासाहेब सोनवणे ७७.४० टक्के तृतीय, स्नेहल भानुदास कांगणे ७६ टक्के चतुर्थ तर मानसी सुधाकर ठोंबरे ७४.२० टक्के मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दत्तू घोटेकर, शिक्षक वैभव कवडे, रोहित गुंडगळ, श्रीमती आरती बडवर, संगीता संधान तसेच पवार, माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत आवारे तसेच मुख्याध्यापक दत्तू घोटेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



