नांदगाव रेल्वे मार्गावर बाभुळवाडी शिवारात अनोळखी इसमाचा मृत्यू; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन
Nandgaon news
नांदगाव रेल्वे मार्गावर बाभुळवाडी शिवारात अनोळखी इसमाचा मृत्यू; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन
वेगवान मराठी : मारुती जगधने दि 8 मे 2026
नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभुळवाडी शिवारात रेल्वे मार्गावर एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना ३० एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी असा अंदाज आहे. बाभुळवाडी शिवारातील रेल्वे किलोमीटर २९२ च्या दरम्यान हा मृतदेह आढळून आला. घटनेची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
घटनेचा तपशील:
पोलीस ठाणे: नांदगाव
अकस्मात मृत्यू रजि. नं.: ३९/२०२६ (कलम BNSS १९४ प्रमाणे)
घटनेची वेळ: ३०/०४/२०२६ रोजी रात्री १२:१० वाजेच्या सुमारास.
मृतदेह मिळाल्याची वेळ: ३०/०४/२०२६ रोजी दुपारी २:२२ वाजता.
मृतकाचे वर्णन:
मृत व्यक्तीचे शरीर सडपातळ असून अंगात राखाडी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे. मृतकाचे केस वाढलेले असून रंग काळा आहे. त्यांची उंची अंदाजे १७० सेमी आहे. मृतकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव झाला असून, पाठ आणि हात-पायावर देखील किरकोळ जखमा झाल्याचे दिसून येत आहेत.
सदर इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. जर कोणाला या वर्णनाच्या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास, त्यांनी तातडीने नांदगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे



