नाशिकची श्रुती जगधने ‘मिस टीन महाराष्ट्र’ स्पर्धेत फायनलिस्ट
Nashik News
नाशिकची श्रुती जगधने ‘मिस टीन महाराष्ट्र’ स्पर्धेत फायनलिस्ट
वेगवान मराठी : दि . 8 मे 2026
नाशिकची कन्या श्रुती जगधाने हिने ‘मिस टीन महाराष्ट्र’ स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत फायनलिस्टपर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमधून निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये श्रुतीची नाशिकमधून निवड झाली असून तिने संपूर्ण महाराष्ट्रात नाशिकचे प्रतिनिधित्व केले.
ही बाब नाशिकसाठी अभिमानाची मानली जात आहे. आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर श्रुतीने स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
श्रुती जगधाने ही सध्या Media and Communication विषयाची विद्यार्थिनी असून, तिने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण नांदगाव येथील VJ High School मध्ये पूर्ण केले आहे. शालेय जीवनापासूनच विविध सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांमध्ये तिचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
‘मिस टीन महाराष्ट्र’ सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत फायनलिस्ट म्हणून निवड होणे ही नाशिक आणि नांदगाव परिसरासाठी गौरवास्पद बाब मानली जात आहे. श्रुतीच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक आणि विविध स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून भविष्यात ती आणखी मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे .



