नाशिक ग्रामीणनाशिक शहर

जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Nandgaon news

वेगवान मराठी : मारुती जगधने
दि . 7 मे 2026

नाशिक जिल्ह्यातील दहेगाव ता . नांदगांव येथे कौटुंबिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली असून पतीविरुद्ध पत्नीने गंभीर आरोप करत नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पत्नीला मारहाण, गळफास देण्याचा प्रयत्न तसेच अल्पवयीन मुलास जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय २८, रा. दहेगाव) यांनी पती संतोष तुळशीराम बागुल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपीला दारूचे व्यसन असून तो वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दि. २९ एप्रिल २०२६ रोजी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या दांड्याने, लाथाबुक्क्यांनी तसेच हाताला लागेल त्या वस्तूंनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या गळ्याला दोरी बांधून गळफास देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या वेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ताराबाई यांनाही आरोपीने मारहाण केल्याचे सांगण्यात आले.
तसेच संतापजनक बाब म्हणजे फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा शिवांश याला उचलून आपटण्यात आले व त्याचा डावा हात जळत्या चुलीत टाकून भाजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने फिर्यादी व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशन येथे CCTNS गु.र.नं. १८३/२०२६ अन्वये भा.न्याय संहिता कलम ८५, १०९, ११८(१), ३५१(२)(३), ३५२ तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गावीत करीत हे करीत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!