नाशिक ग्रामीण

शेळीची शिकार करताना पडला विहीरीत,आणि झाला पिंजऱ्यात कैद.वनविभागाची कामगिरी

मुंजवाडला शेळ्यांची शिकार करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.२६सप्टेंबर २०२५:-बागलाण तालुक्यातील मुंजवाड परिसरात गेल्या महिनाभरापासून दहशत माजवणाऱ्या  बिबट्याला अखेर वन विभागाने  पिंजऱ्यात कैद केले. शेळीवर हल्ला करुन तिला तो खेचत असतांना विहिरीत पडल्याने ही कारवाई शक्य झाली. शुक्रवार(दि. २६) रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सतीष शिंदे यांच्या हत्ती नदीकाठी असलेल्या शेतातील विहिरीलगत रखवालदार मालजी  श्रावण वाघ यांच्या झोपडीजवळ हा प्रकार घडला.

शेळीचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या वाघ यांनी बिबट्याने तिला जबड्यात पकडल्याचे पाहिले. प्रसंगावधान राखून त्यांनी काठीने हल्ला चढविला असता बिबट्या पळून जाताना विहिरीत पडला. घाबरलेल्या वाघ कुटुंबाने शेजारी चिंतामण जाधव यांना मदतीसाठी बोलावले. दरम्यान, बिबट्या विहिरीतून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता पण त्याला बाहेर निघता आले नाही. शेतमालक सतीष शिंदे यांनी वन विभाग आणि मुंजवाडचे पोलिस पाटील यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. तत्काळ वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत गर्दी कमी केली. सकाळी दहाच्या सुमारास पिंजरा आणण्यात आला. वनपाल सुदाम पवार, पोलिस पाटील दीपक सूर्यवंशी, कृष्णा काकुळते यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याचे रेस्क्यू करण्यात आले.

 

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!