मंगला एक्सप्रेस कोच मध्ये अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून..

वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव,ता. 25 जुलै 2025 -मंगला एक्सप्रेस च्या ए वंन कोच मध्ये एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या सं शर्यात युवकाला मनमाड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे .
मध्य प्रदेशातील एक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासमोर ही घटना घडली तेव्हा रात्रीच्या प्रसंगी वरच्या बर्थ सीटवर झोपलेल्या बालिकेशी सदर संशयीताने असभ्यवर्तन केले सदर अल्पवयीन मुलीच्या विरोधानंतर तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.
मुलीने विरोध केल्यानंतर संशय तिथून पळाला परंतु मुलीच्या पालकांनी पाठलाग करत त्याला पॅटरीकार जवळ धरले या वेळी लोहमार्ग सुरक्षा दलाच्या मदतीने सदर संशयीताला मनमाड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात छेडखानी आणि पोस्को कायद्यांतर्गत कल मा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संशयीताला मालेगाव न्यायालयात हजर केले असता त्या स दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोगदंड करत आहे या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे रेल्वे प्रवासामध्ये रेल्वे बोगी मध्ये सुरक्षा गार्ड देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते
हजर निजामुद्दीन ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या मंगला एक्सप्रेस मध्ये ए वन कोच मध्ये सदर घटना घडल्याचे पोलिस निदर्शनास आले .



